कांद्री येथे एक लाख तीन हजाराची घरफोडी.
नागपूर कन्हान : – शंकर नगर कांद्री येथे अञात चोरानी घरफोडी करून सोने , चांदीचे दागिने व नगदी ७७ हजार रूपये असा एक लाख तीन हजार सहासे रूपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाले.
शंकर नगर वार्ड क्र ६ कांद्री येथील रहिवासी इंदुबाई एकनाथजी गोंडाणे या आजुबाजुच्या गावात बांगडया विकुण उदर्निवाह करतात. ंया नागपुर ला राहणा-या मुलीकडे शुक्रवार (दि.२७) ला गेल्या होत्या तेथे मुक्काम केला. शनिवार (दि.२८) ला १२.३० वा . भाडेकरू गणेश पाचघोर यांनी फोन करून विचारले की काकु तुम्ही घराला कुलुप लावले नाही का ? मी लावुन आले होते. सध्याचे तु कुलुप लावुन दे असे सांगितले. मला संशय आल्याने माझी मुलगी २ वाज ता कामावरून घरी आल्यावर तिला सांगितले आणि आम्ही दोघी मायलेकी कांद्रीला घरी परत येऊन गणेश ला कुलुप उघडुन आत बघितले तर लोखंडी कपाट व लॉकर उघडे असुन त्यात ठेवलेले माझ्या पाच एकर शेती ठेक्याचे ३० हजार, तीन एकर चे २५ हजार, बॅके तुन काढलेले सात हजार, खर्चाचे पाच हजार, असे नगदी ७७ हजार, सोन्याचे झुमके ६ ग्रॅम किमत पंधरा हजार रू., २ ग्रॅम नथ किमत पाच हजार रू चांदीच्या पायपट्टी २२ ग्रॅम किमत ६६०० रू असा एकुण एक लाख तीन हजार सहाशे रूपयांचा मुद्देमाल अञात चोरांनी चोरून नेल्याचे दिसल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस स्टेशनचे सपोनि जावेद शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे निर्देशनात आल्याने अञात आरोपी विरूध्द कलम ३८०, ४५७ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५