कन्हान नगरपरिषदेत उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करा. कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदनाने मागणी.

कन्हान : – ग्रामपंचायत च्या कार्यकाळापासुन तर क न्हान-पिपरी नगरपरिषद होऊन सहा वर्ष झाल्यावर ही येथे अग्निशमन यंत्रणाची व्यवस्था नगरपरिषद प्रशास नाने केली नसुन कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्र विण गोडे यांच्या नेतृत्वात नप नगराध्यक्षा व मुख्याधि कारी यांना भेटुन या विषयी चर्चा करून निवेदन देऊन उन्हाळ्या पुर्वी कन्हान-पिपरी नगरपरिषदेत अग्निशम न यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कन्हान शहराची व्याप्ती वाढल्याने राज्य सरकार ने कन्हान ग्राम पंचायतीचे रुपांतर नगरपरिषद मध्ये केले असुन सहा वर्ष झाल्यावर ही कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध केलेले नसुन शहरात आग लागल्याने कामठी, रामटेक नगर परिषद येथुन अग्निशमन बंब बोलवावे लागते. ते लांबु न येई पर्यंत नागरिकांचे जीवनावश्यक सामग्री जळुन नष्ट होते. यास्तव कन्हान-पिपरी नगरपरिषदेत अग्निश मन यंत्रणा उपलब्ध करण्याची अंत्यत आवश्यकता आहे. उन्हाळ्यात सुर्याच्या तीव्र तापमानाने आग लाग ण्याचे प्रकरण घडत असतात. या उन्हाळ्या पुर्वी कन्हा न-पिपरी नगरपरिषदेत अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नप नगराध्य क्षा करूणाताई आष्टणकर व मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे हयांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, प्रविण माने, अखिलेश मेश्राम, सोनु खोब्रागडे सह मंच पदाधि कारी उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद
9579998535