कढोलीत पोस्टर्स मेकिंग कॉम्पिटिशन व वॉल पेंटिंग स्पर्धा संपन्न….
नागपूर कामठी……….भारत सरकारचा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार चा अंतर्गत येणारी भारताची सर्वात मोठी युवा संघटना नेहरू युवा केंद्र नागपूर ,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई ,जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण पथक नागपूर व ग्रामपंचायत कढोली यांचा संयुक्त विधमाने कामठी तालुक्यातील कढोली या गावामध्ये पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आणि वॉल पेंटिंग करण्यात आली
नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा कोर प्रथमेश खूरपडी व प्रशांत महल्ले यांचा युवा नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा आयोजित करण्याचा उदेश्य म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना आपल्या कलेचं सादरीकरण करता यावं त्याच बरोबर लोकान मध्ये HIV AIDS या रोगा बद्दल व रोग्यान बद्दल गैरसमज दूर व्हावे आणि त्याबाबत योग्य अशी माहिती मिळावी .या वितिरिक्त गावाच्या प्रमुख ठिकाणच्या भिंतीवर एचआयव्ही एडस् बद्दल महत्त्वाची माहिती च लेखन करून जनजागृती करण्यात आली.
या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून कढोली गाव चे सरपंच प्रांजल राजेश वाघ उपस्थित होते तसेच नागपूर जिल्हा चे युवा वक्ते विनय पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वीटी महुर्ले, दृतीय क्रमांक कामिनी रमेश वाघ आणि तृतीय क्रमांक ज्ञानेश राजेश वाघ यांनी प्राप्त केले.
कार्यक्रमाचा यशस्वितसाठी ग्रा.पं.सदस्या दुर्गा कडू ,मीनाक्षी वाघ ,रोशनी महल्ले व ईतर गावकरी मंडळी नी सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535