महाराष्ट्र

आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचेच धान खरेदी करा -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Summary

भंडारा दि. 31 : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये, प्रामाणिकरित्या शेतकऱ्यांच्याच धान पिकाची खरेदी करावी. धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळाने व्यापारी व दलालांपासून सावध राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. साकोली […]

भंडारा दि. 31 : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये, प्रामाणिकरित्या शेतकऱ्यांच्याच धान पिकाची खरेदी करावी. धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळाने व्यापारी व दलालांपासून सावध राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

साकोली येथील श्रीराम सहकारी भात गिरणी केंद्रातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी उपरोक्त सूचना केल्या. शेतकऱ्यांनी आपले धान पिक व्यापारी व दलालांना विक्री न करता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर  विक्री करावी असे आवाहन त्यांनी केले. धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होता काम नये, असे सांगून श्री. पटोले म्हणाले की, ही सुविधा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळायला हवा व्यापाऱ्यांना नाही.

या उद्घाटनप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, श्रीराम सहकारी भात गिरणीचे  अध्यक्ष पतिराम कापगते, उपाध्यक्ष हरिदास समरीत, अरुण बडोले, महादेव कापगते, मनोहर कापगते, परसराम कापगते, सेवक लांजेवार, व्यवस्थापक जी बी समरीत, ग्रेडर सी. एम. कापगते उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम केंद्रावर धान विक्रीकरिता आणणारे शेतकरी सेवकराम लांजेवार यांचा सत्कार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *