आठ दिवसात कारवाई करा ! जालना सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे राज्यमंत्री सत्तार यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Summary
सिल्लोड (प्रतिनिधी, ता.17): जालना सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांनी दिले. मुंबई येथील मंत्रालयातील दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन […]
सिल्लोड (प्रतिनिधी, ता.17): जालना सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांनी दिले. मुंबई येथील मंत्रालयातील दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एम. पी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रानडे आदी उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील रामवाडी येथे जालना सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आज मंत्रालयातील दालनात राज्यमंत्री सत्तार यांनी बैठक घेतली. या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन त्यानंतर आठ दिवसात जमिनीचे मोजमाप करून अहवाल सादर करा, त्यानंतर अतिक्रमण धारकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
कायदेशीर बाबी तपासून कारवाई करा …..
- अतिक्रमण केलेल्या जागेवर जागेवरच्या सर्व कायदेशीर बाबी तपासून न्यायालयांचे सर्व कागदपत्र तपासून त्यानंतर कायदे सल्लागाराचा सल्ला घेऊन अतिक्रमण धारकांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क मराठवाडा प्रतिनिधी शेख चांद