BREAKING NEWS:
महाराष्ट्र

अवैध्य धंद्यांना लगाम लावण्याकरिता राजुरा ठाणेदार रुजू झाले नवनियुक्त,डी. बी.विभाग मात्र सुस्त! राजुरा डी. बी.बरखास्त करा अशी जनतेतून मागणी राजुरा मध्ये आणखी एक खूण करणार असल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल नवनियुक्त ठाणेदार यांना अवैध धंदे वाल्यांचे आव्हान

Summary

राजुरा :- एकेकाळी अतिशय शांत मानले जाणारे राजुरा पोलिस स्टेशन हे गेल्या काही वर्षात अतिशय चर्चेत राहिलेले आहे. ३ वर्षात ८ ठाणेदार बदलून गेल्याचा विक्रम सुद्धा राजुरा पोलिस स्टेशन च्या नावानेच आहे. राजुरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे वाढल्याचे […]

राजुरा :- एकेकाळी अतिशय शांत मानले जाणारे राजुरा पोलिस स्टेशन हे गेल्या काही वर्षात अतिशय चर्चेत राहिलेले आहे. ३ वर्षात ८ ठाणेदार बदलून गेल्याचा विक्रम सुद्धा राजुरा पोलिस स्टेशन च्या नावानेच आहे. राजुरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दारूविक्री,क्षभंगार चोरी, कोळसा तस्करी अशे अनेक धंदे खुलेआम सुरू आहे. कोळसा तस्करीचे अनेक प्रकार या भागात भर रस्त्यावर सुरू आहे याच कारणाने राजुरा मध्ये गोळीबार करून एका कोळसा व्यावसायिकाची हत्या करण्यात आली.
राजुरा पोलिस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार बहादूरे व एपी.आय साखरे यांनी अवघ्या एका तासात खुनाच्या आरोपीला पकडुन ठाणेदार यांनी आपल्या आडणावाप्रमाने बहादुरी दाखवली. परंतु तालुक्यातील अवैध धंदे अशेच सुरू राहिल्यास आणखी एक खूण व्हायला वेळ लागणार नाही. नवनियुक्त ठाणेदार असल्याने त्यांना या धांद्यांबद्दल अजुन पुरेशी माहिती नसल्याने राजुरा डी. बी विभागातील काही पोलिस अवैध् धंदे वाल्याकडून मोठी रक्कम गोळा करत असल्याची चर्चा जनतेमध्ये बघायला मिळत आहे.अवैध्य धंदे बंद करायचे असल्यास नवीन ठाणेदार बहादुरे यांनी डी. बी विभाग पूर्णपणे बरखास्त करून त्यात नवीन शिपायाची भरती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा येत्या काही दिवसात राजुरा मध्ये आणखी एक खूण करणार असल्याची फेसबुक वर पोस्ट सुद्धा टाकली असल्याची माहिती आहे.आता ठाणेदार बहादूरे हे डी. बी बरखास्त करून बहादुरी दाखवणार की परत अवैध धंद्यांना फोपिविण्यासाठी मदत करणार याकडे राजुरा मधील संपूर्ण जनतेच लक्ष लगेलेल आहे.
दारूविक्री,कोळसा तस्करी करणाऱ्यांचे ठिकाण आणि नावे हे डी. बी.विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती आहे तरी माहिती नसल्यास भाग २ मध्ये या सर्व अवैध धंदे करणाऱ्यांचे नाव व ठिकाण प्रकाशित करून पर्दाफाश करणार हे मात्र नक्की.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *