महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिवाळीत केली स्वीटमार्ट व हॉटेल्सची तपासणी नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश

Summary

बुलढाणा, दि. 15:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारामध्ये मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: नुकतीच केली आहे. बुलढाणा […]

बुलढाणा, दि. 15:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारामध्ये मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: नुकतीच केली आहे.

बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही, पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी केली.

 ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. एन दिवाळीच्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये जरब बसणार आहे.

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *