अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आव्हानानुसार ५ नोव्हेंबर २० ला रस्ता रोको आंदोलन
जबलपुर वार्ता:- लोकशाहीला फाटा देऊन मोदी सरकारने शेती शेतकऱ्यांच्या विरोधात कार्पोरेट भांडवलदारांना लूट करण्यास मोकळीक देण्याकरिता तीन कायदे पारित केले. जमाखोरी कायदा नुसार आता धान्य, डाळी, जीवनावश्यक वस्तूंचा आता कितीही साठा करता येईल. यामुळे जमखोरी करून मोठ्या प्रमाणात जनतेची लूट करता येईल. ओपन मार्केट मूळे पहले जास्त भाव देऊन शेतमाल खरेदी केल्या जाईल. नंतर मोनोपोली निर्माण करून नंतर शेतकऱ्यांना लुटल्या जाईल. कॉन्ट्रॅक्ट शेतीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांशी एका निश्चित भावावर माल घेण्याचा करार परंतु नैसर्गिक संकट आल्यास त्याचं भावात शेतमाल खरेदी करण्याची खात्री राहणार नाही. हमिभवाचा कुठेच या कायद्यामध्ये उल्लेख नाही . आणि म्हणून या कायद्याविरोधात शेतकरी संतप्त आहेत. पंजाब मध्ये रावण दहणाच्या ठिकाणी माा. नरेंद्र मोदी आणि अडाणी, अंबानी यांचे दहन करण्यात आले. जय जवान जय किसन संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा तर्फे ५ ऑक्टम्बरला जबलपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करेल. असे संयोजक कॉमरेड अरुण वनकर यानी या पत्रकाद्वारे कळविले आहे.
अरुण वनकर
मो. ९८५०७०४०२०