सुलभ शौचालयात लाईट ची सुविधा व नियमित साफ सफाई करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे नप कार्यकारी अधिक्षकाला निवेदन.

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. सात मटन मार्केट परिसर कन्हान पोलीस स्टेशनच्या बाजुला नाग रिकांकरिता नगरपरिषद प्रशासना द्वारे सुलभ शौचाल य बनविण्यात आले असुन या शौचालयात दोन महि न्यापासुन लाईटची सुविधा उपलब्ध करण्यात आली नसल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालय अधीक्षक हर्षल जगताप यांना भेटुन चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ सुलभ शौचा लयात लाईटची सुविधा उपलब्ध व नियमित साफ सफाई करण्याची मागणी केली आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन द्वारे मटन मार्केट परिसर गांधी चौक कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला नागरिकांकरिता सुलभ शौचालय बनवुन १५ ऑगस्ट २०२१ ला लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु दोन महिन्याचा कालावधी लोटुन सुद्धा नगरपरि षद प्रशासना द्वारे या सुलभ शौचालयात लाईटची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. या कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला व संपुर्ण परिसरात दररोज कधी न कधी रात्री व भरदिवसा साप आणि सरपटणा रे अनेक प्राणी, जिव जंतु निघत असतात. मागील दहा दिवसा पुर्वी कन्हान पोलीस स्टेशन येथे साप निघाला होता. तसेच शुक्रवार (दि.५) नोव्हेंबर ला भरदिवसा सुलभ शौचालयात मोठा धामन साप निघाल्याने परिस रातील व शौचालयात जाणाऱ्या नागरिका मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले असुन रात्रीच्या वेळी सुलभ शौचालयात अंधार असल्याने कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुलभ शौचालयात नियमित साफ सफाई होत नसल्याने हळुहळु अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात नप कार्यालय अधिक्षक हर्षल जगताप यांना भेटुन चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ गांधी चौक येथील नगरपरिषद प्रशासना द्वारे बनविण्यात आलेल्या सुलभ शौचालयात लाईटची सुविधा उपलब्ध करण्याची व नियमित साफ सफाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, हरीओम प्रकाश नारायण, सुरज वरखडे, कामेश्वर शर्मा, महेंद्र साबरे, हर्ष पाटील, किरण ठाकुर, शाहरुख खान, महादेव लिल्हारे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535