नागपुर

वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्याच्या (जीवावर)मुळावर! 26 Jul 2021-07-33 रोह्यांच्या कळपाने सोयाबीनचे उभे पीक केले फस्त!!

Summary

काटोल/प्रतिनिधी  दुर्गाप्रसाद पांडे शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा करून अमलात आणला,यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे, मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेतशिवरात शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे, आता तर वन्यप्राणी पिकाचे नुकसान तर करताच पण शेतकऱ्यावर ही हल्ले करून शेतकऱ्याचा […]

काटोल/प्रतिनिधी  दुर्गाप्रसाद पांडे

शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा करून अमलात आणला,यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे, मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेतशिवरात शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे, आता तर वन्यप्राणी पिकाचे नुकसान तर करताच पण शेतकऱ्यावर ही हल्ले करून शेतकऱ्याचा जीव घेतात,त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यासाठी जीवघेण्या ठरत आहे.
यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी (पराटी) व सोयाबीनच्या पिकांची पेरणी केलीआहे, परंतु पेरणीनंतर एक पाऊस येऊन, पावसानेजून चे मध्यान्य पासून दडी मारल्याने, शेतकऱ्यांना पिकांची मोड़ करण्याची पाळी आलीच होती,परंतु लांबलेया पावसाला जूलै महिन्याचे मध्यात सुरवात, झाल्याने आसमानी संकटातून होरपळून निघालेल्या शेकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु परिसरात वन्यप्रन्यानी उपद्रव सुरू केला असून, कोंढाळी लगतच्या बोरगाव, येथिल शेतकरी कृष्णाराव भांगे, व अन्य शेतकर्यां च्या शेतातील, सोयाबीन चे पीक, रोह्यांनी उध्वस्त केले, आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी जीवन कसे जगावे असा प्रश्नं उपस्तित होत आहे,
परिसरात असलेल्या शेत शिवारात रात्रन दिवस वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असून वन्यप्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे,विशेष म्हणजे हा प्रकार डोळ्या देखत होत असूनही कायद्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे, पेरणी पासून तर पीक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करून संवर्धन करतो,यासाठी त्याला महिण्यकाठी हजारो रुपये खर्च येतो, मात्र वन्यप्राण्यांच्या उपद्रवला शेतकरी रोखण्यास असमर्थ ठरत आहे,त्यामुळे त्यांचे दरवर्षी नुकसान होत आहे,कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी रानडुकराचा टोळ्या च्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. वनविभागाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करुण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने कोंढाळी चे वन परिक्षेत्र अधिकारी एफ आर आजमी यांचे कार्यालयात वन्यप्राण्यानी केलेल्या नुकसान चे तक्रार केली आहे, या बाबद ची तक्रार मिळताच कोंढाळी उपवनपरिक्षेत्र अधिकारी योगेश नाप्ते यांनी संबधित शेतकर्यांचे शेतावर जाऊन मौका पंचनामा केला आहे. या नुकसान भरपाई करिता शेतकर्यां ना पीकाच्या नुकसान करीता वन विभागाने कडून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकर्यांकडून केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *