नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा केंद्राचा तीढा एका शाळेतील सर्व परिक्षार्थींना जवळचे एकच परिक्षा केंद्र देण्याची मागणी.
कन्हान : – नवोदय विद्यालय समिती द्वारा दरवर्षी इयत्ता सहावी चे प्रवेशाकरीता पाचवी च्या विद्यार्थ्यां साठी प्रवेश परिक्षेचे आयोजन केले जाते. परंतू परिक्षे चे आयोजन करतांना एकाच शाळेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे व लांब लांब अंतरावरील परिक्षा केंद्र दिले जाते त्यामुळे त्यात्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थी उपस्थित ठेवणे अडचणीचे ठरते परिणामी काही विद्या र्थी या परीक्षेपासुन वंचित राहण्याची शक्यता असते. अशातच सदर परीक्षेला शाळेतील १०० % विद्यार्थी प्रविष्ठ करण्याबाबत श्री.काटोलकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी नुकतेच पत्र काढले त्यामुळे परिक्षा केंद्राचा घोळ आणखीनच वाढणार आहे. या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. काटोलकर यांची भेट घेऊन नवो दय विद्यालय प्रवेश परीक्षेला एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे व दुरदुरचे परिक्षा केंद्र न देता शाळेपासुन जवळच्या अंतरावरील एकच परिक्षा केंद्र दिले जावे या करीता संबंधित परिक्षा समितीशी संप र्क करून मार्ग काढावा तसेच १०० % ची अट न ठेव ता पूर्वी प्रमाणेच परिक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असु द्यावी अशी मागणी केली. याबाबत नवोदय विद्यालय च्या संबंधित यंत्रणेला पत्र लिहुन एकच परिक्षा केंद्र देण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष धनराज बोडे सह सुनिल पेटकर, विरेंद्र वाघमारे, दिलीप जीभकाटे व भोलेश उईके उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो