कन्हान-कांद्री ला ऋषिपंचमी व श्री गजानन महाराज पुण्यतिथी साजरी
संजय निंबाळकर/उपसंपादक
कन्हान : – शहरात व परिसरात ऋषिपंचमी व श्री गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त महिलांनी नदीवर जाऊन आंघोळ करून पुजा पाठ करून ऋषिपंचमी साजरी केली तसेच कांद्री वार्ड क्र. ५ येथील गजानन नगर परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिरात संत गजानन भजन मंडळ द्वारे विविध कार्यक्रम करून नागरिकांना प्रसाद वितरण करून ऋषिपंचमी व श्री गजानन महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
ऋषीपंचमी हे भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे पुजा करतात. यावरून या दिवसाला ऋषि पंचमी हे नाव मिळाले असुन शनिवार (दि.११) सप्टें बर ला कन्हान शहरातल्या महिलांनी कन्हान नदीवर जाऊन आंघोळ करून पुजा पाठ करित ऋषिपंचमी साजरी केली. तसेच याच दिवसी संत श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी दिवस असल्याने कांद्री वार्ड क्र. ५ येथील गजानन नगर परिसरातील संत गजानन महाराजांच्या मंदिरात संत गजानन भजन मंडळ द्वारे कार्यक्रमाचे प्रमुख अजितजी बावने, योगेश वाडीभस्मे , विक्रम गायकवाड, रमेश पोटभरे व सहकारी मंडळी यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यकामाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी संत गजानन भजन मंडळाने भजन, कीर्तन सादर करून दहिकाला कार्यक्रम डॉ प्रफुलजी गायक वाड यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांना प्रसाद वितरण करून सांगता करण्यात आली. यावेळी अरूण पोटभरे, धनराज क्षिरसागर, शिवाजी चकोले, सेवक गायकवाड , ज्ञानेश्वर गिऱ्हे, मधुकर कांबळे, महादेव मानकर, बालाजी गिऱ्हे, संज्ञाबाई गिऱ्हे, मायाबाई बोरकर, शशिकला गायकवाड, पुष्पाबाई वानखेडे, शुभांगी सपकाळ, कुसुंमबाई गिऱ्हे, अंजलीबाई गिऱ्हे, सुनिता हिवरकर, उषा वंजारी, इंदुबाई टेंभरे आदी सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.