सलून व्यवसायीकांनी मानले फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे आभार सलून व्यवसायीकांकरिता दिले होते प्रशासनाने कडक बंदचे आदेश
Summary
चंद्रपूर – सलून व्यवसायीकांकरिता प्रशासनाने कडक बंदचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सलून व्यवसायीकांच्या शिष्टमंडळाने फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. प्रशासनाने यावर पाठपुरावा करत रविवारी सलून व्यवसाय […]
चंद्रपूर –
सलून व्यवसायीकांकरिता प्रशासनाने कडक बंदचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सलून व्यवसायीकांच्या शिष्टमंडळाने फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. प्रशासनाने यावर पाठपुरावा करत रविवारी सलून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली. फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांच्या प्रयत्नामुळे मुभा मिळाल्यामुळे ७०० सलून व्यावसायिक असलेल्या सलून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर सारडा यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले. सलून व्यावसायिकांनी सोमवारी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुन्ना चांडक, चिराग नथवानी, मनीष राजा, न्हावी व सलून अससोसिएशनचे महेश आंबेकर, अमर वाटेकर, ज्ञानेश्वर वाटेकर, रोहित कडुकर, संतोष नॅप्पित, रवि येसेकर, प्रणीत वाटेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.