प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे लागली चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग: आप चे राजु कुडे यांचा आरोप
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
मंगळवार ला रात्री ०७:३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर मधील पागल बाबा नगर येथील चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग लागली होती.
याची माहिती मिळताच आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे हे आपल्या कार्यकर्ते सोबत घटना स्थळी पोहचले.
घटनेच्या प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित कामगार यांच्या कढून संपूर्ण माहिती घेतली. कामगारांनी संगितले की तिथे सुरक्षा संबंधित असणारे कोणते ही उपाययोजना केलेल्या नव्हत्या जसे, अग्निशमन वाहन, फायर सिलेंडर, इत्यादी उपकरणाची व्यवस्था तेथील व्यवस्थापकांनी केलेली नव्हती..
जर तिथे फायर ब्रिगेड ची वाहन हजर असती तर ही आग आटोक्यात आणता आली असती परंतु कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे ही आग लागली सुदैवाने कुठली ही जीवित हानी झाली नाही परंतु अशी काही घटना घडली असती तर याला जबाबदार कौन असते.? असा प्रश्न आम आदमी पार्टी चंद्रपूर ने केला आहे.
तसेच या आगीत कामगाराचे खुप आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे महत्वाचे कागदपत्र पूर्णपणे जळाले असून त्यांची तात्काळ प्रशासनाने मदत करावी.अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर तसेच जिल्हा मिळून कामगारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आप चे शहर सचिव राजु भाऊ कुळे यांनी आव्हान केले आहे.
तसेच संबधित दोषी अधिकारी व व्यवस्थापकावर कडक कारवाई करण्यात यावी.जेणेकरून भविष्यात अशी घटना परत घडणार नाही .
यावेळेला आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे, बाबुपेठ प्रभाग सहसण्योजक निखिल बारसागडे, चंदु भाऊ माडुरवार, अंकूश राजूरकर, हितेश धोकडे, जयदेव देवगडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.