ब्लॉग

हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची तक्रार तुमच्या तक्रारीत कोणत्या बाबींचा समावेश हवा?

Summary

– विवाहाचे तपशील, उदाहरणार्थ, निमंत्रण पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, फोटो, व्हिडिओ आदी – ज्यांच्याविरोधात आरोप आहेत अशा व्यक्तींची नावे व त्यांचे पत्ते, पासपोर्ट्स आदी तपशील – छळाचे तपशील, उदाहरणार्थ, छळाचा कालावधी, काळ, स्थळ व प्रकार – हुंडा मागितला असल्यास त्याचे तपशील […]

– विवाहाचे तपशील, उदाहरणार्थ, निमंत्रण पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, फोटो, व्हिडिओ आदी

– ज्यांच्याविरोधात आरोप आहेत अशा व्यक्तींची नावे व त्यांचे पत्ते, पासपोर्ट्स आदी तपशील

– छळाचे तपशील, उदाहरणार्थ, छळाचा कालावधी, काळ, स्थळ व प्रकार

– हुंडा मागितला असल्यास त्याचे तपशील

– तुम्ही हुंड्याची रक्कम बँकखात्याद्वारे दिली असेल, तर बँकेचे स्टेटमेंट

– हुंडा धनादेशाद्वारे (चेक) दिला असेल तर त्याचे तपशील

– ज्या व्यक्तीला हुंडा दिला गेला, त्याचे तपशील

– शारीरिक हिंसा झाली असेल, तर जखमांचे व त्या करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचे तपशील

– लग्न जमवणाऱ्या व वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे तपशील

– मध्यस्थ/समुपदेशन सत्र झाली असतील, तर ती कुठे झाली याचे तपशील

– साक्षीदारांचे, विशेषत: स्वतंत्र साक्षीदारांचे,  आणि तुमच्या मुलांचे तपशील

– लग्नादरम्यान काही लेखी करार झाले असतील, तर त्याच्या प्रती

– दागिने/रोख पैसे/कपडे/वाहने आदी जंगम स्वरूपातील भेटवस्तूंचे तपशील तसेच भूखंड/फ्लॅट आदी स्थावर स्वरूपातील भेटींचे तपशील

– तक्रार नोंदवण्यास विलंब झाला असेल, तर त्या विलंबामागील कारणे

– पीडितेची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक

४९८ (अ) कायद्याचा गैरवापर टाळण्यात व तुमची केस मजबूत करण्यात आम्हाला मदत करा

– नेहमी लक्षात ठेवा! जोडपे व मुलांनी परस्परात केलेले समुपदेशन अन्य कोणत्याही समुपदेशनाहून चांगले ठरते.

– चुका माणसाच्या हातून होतातच! चुका दोन्ही बाजूंनी होऊ शकतात. आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी कोणीही कायद्याचा वापर करू नये

– पोलीस ठाण्याची पायरी चढण्यापूर्वी दोघांनी परस्परांना समजावण्याचा प्रयत्न करा.

– तुमच्याबाबत घडलेल्या बाबी कधीही अतिशयोक्त स्वरूपात मांडू नका. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, समस्येबाबत स्पष्ट, मोकळेपणाने व मुद्दयाला धरून सांगा.

– छळाशी संबंध नसलेल्यांची नावे छळाशी जोडू नका. प्रामाणिकपणे तक्रार करा.

– नेहमी लक्षात ठेवा! ४९८ (अ) हा कायदा सुडासाठी नाही, तर छळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी आहे, जेणेकरून, बाकीच्यांनाही धडा मिळावा.

– तुमच्या हतबलतेचा फायदा घेण्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. ते तुम्हाला छळाची तथ्ये अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचे, छळात सहभागी नसलेल्यांची नावे तक्रारीत समाविष्ट करण्याचे, हुंड्याची रक्कम वाढवून सांगण्याचे दिशाभूल करणारे सल्ले देऊ शकतात. 

– तुम्हाला जे भोगावे लागले ते व्यक्त करण्यात कोणाची मदत हवी असेल, तर मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची किंवा हेल्पलाइन्सची मदत घ्या.

तुमची हुंड्याची रक्कम परत मिळवून देण्याचा वायदा करणाऱ्या लबाड लोकांची मदत घेऊ नका, ते समोरच्यांकडून खंडणी मिळवतात व तुमची केस कमकुवत करतात. 

– तुमच्या तक्रारीची मसुदा तयार केला जात असताना तेथे उपस्थित राहा आणि हा मसुदा पोलिस ठाण्यात दाखल करण्यापूर्वी, तो लिहिणाऱ्यांकडून, मोठ्याने वाचून घ्या.

– केस मजबूत करण्याच्या उद्देशाने तक्रारीतील आशय अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचा सल्ला काही पीडितांना दिला जातो.  प्रत्यक्षात मात्र तक्रारीचे सर्वांत मोठे बलस्थान हे पीडितेने सादर केलेले पुरावे असतात. तक्रारीतील मजकुराला प्रत्यक्ष तथ्यांचा आधार मिळाला नाही, तर केस कमकुवत होते व पीडितेला न्याय मिळणे कठीण होते.

– प्रकरणाचा तपास करण्यासाठी तसेच आरोपीला अटक करण्यासाठी संबंधित पोलिस किंवा अधिकारी पैशाची मागणी करत असतील, तर ते कधीही देऊ नका. त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घाला.

– तुमच्या मुलीला जो जिव्हाळा मिळाला पाहिजे, जसे जपले गेले पाहिजे, त्या जिव्हाळ्यावर व काळजीवर सुनेचाही अधिकार आहे हे कधीच विसरू नका.

– लक्षात ठेवा! ४९८ (अ) हे समोरच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणण्याचे साधन नाही. विवाहातील प्रतिकूलतांवर तोडगा काढण्यासाठी अन्य अनेक कायदेशीर प्रक्रिया आहेत.

– ४९८ (अ) हे मुलांचा ताबा मिळवण्यासाठी वापरण्याचे हत्यारही नाही. यासाठी पर्यायी कायदेशीर पद्धती आहेत.

– ज्या दिवशी तक्रार दाखल झाली, त्याच दिवशी आरोपीला अटक करा असा दबाव पोलिसांवर कधीच आणू नका, कारण, विश्वासार्ह पुरावा जमवण्यासाठी वेळ लागतो. मात्र, तक्रार दाखल करतानाच बहुतेक पुरावे सादर करून तुम्ही पोलिसांना तपासाचा वेग वाढवण्यात मदत नक्कीच करू शकता.

– आरोपीचा देशाबाहेर जाण्याचा बेत आहे अशी माहिती तुम्हाला मिळाली, तर तुम्ही ते तपास अधिकाऱ्यांना त्वरित सांगणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास, पोलिस सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच समुद्रीतळांवर (सीपोर्ट्स) इशारा देऊ शकतात.

– जर तुम्ही पालक असाल, तर मुलीकडून सर्व तथ्यांची खात्री करून घेतल्याखेरीज तक्रार दाखल करू नका. तपासासाठी मुलीचा जबाब महत्त्वाचा असतो.

– देशभरात ४९८ (अ) या कायद्याखाली आरोपी दोषी ठरवले जाण्याचा दर अत्यंत कमी आहे. यामागे अनेक कारणे आहेत. तपासादरम्यान जे काही सांगितले त्यावर खटल्यादरम्यान ठाम राहून, तुम्ही आम्हाला, हा दर सुधारण्यात मदत करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *