लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची ? आजच्या स्थितीत महत्त्वाचे.
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 18 मे. 2021
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा फायदाही समोर येत आहे. त्यामुळे लसीकरणासही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तत्पुर्वी लसीकरणाचे फायदे व गरज किती बहुमोल आहे व कोणती काळजी घेतली पाहिजे .लस घेण्यापूर्वी…?
लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर तरी
अतिरिक्त मद्यपान करू नये.
लसीकरणाच्या भीतीने ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्या खाऊ नयेत. मानसिक दडपण घेऊन लस घेऊ नये. मानसिक दडपणामुळे कोणत्याही प्रकारचे त्रास आपण स्वतःहून ओढवून घेतो. हे नागरिकांनी लक्षात घेऊन लस घ्यावी.
*लस घेतल्यावर…*
दोन दिवसांत सर्व काही नॉर्मल होते. लसीकरणानंतर विश्रांती घ्यावी. उन्हाळा असल्याने भरपूर पाणी प्यावे. लस घेतल्यावर काही काळ ताप येणे, अंगदुखी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी
मद्यपान टाळावे. ॲलर्जीमुळे अंगावर पुरळ उठण्याची शक्यता असू शकते. दंड दुखणे, इंजेक्शनची जागा लाल झाली तरी काळजी नाही.
लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळा
पहिल्या डोसनंतर दुसरा डोस केव्हा ? पहिली लस घेतल्यावर १४ दिवसांनी त्याचे परिणाम दिसण्यास सुरवात होते.
पहिली लस घेतल्यावर दुसरी लस सहा ते आठ आठवड्यांनी घेणे आवश्यक आहे..
लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर..?
दुसऱ्या लसीला बूस्टर डोस म्हणतात. दोन्ही डोस घेऊन ३० दिवसांची प्रतीक्षा केल्यावर ९५ टक्क्यांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढते. कोरोनाचा धोका ९९ टक्के टळतो. त्यातूनही कोरोनाची लागण झाली तर मृत्यू वा प्रकृती गंभीर होण्याचीही अजिबात शक्यता नाही. घरात उपचार घेऊनही रुग्ण बरे होऊ शकतात. असा दावा संशोधक करत आहेत.लस घेतल्यावर त्रास कोणाला ? ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, एखादी लस घेतल्यावर ॲलर्जी होणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करूनच लस घेणे उपयुक्त ठरणार आहे. एकपेक्षा अधिक आजार असणाऱ्यांनाही वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे.