चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात; तीन जण गंभीर जखमी…
Summary
चंद्रपूर: चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर आज सायंकाळी ६:३० च्या दरम्यान चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असताना दुचाकी गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने एपीजे अब्दुल कलाम गार्डनच्या जवळ अपघात घडल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुचाकीस्वारांनी मागून सायकल चालकाला धडक दिली. यामुळे दुचाकीचे नियंत्रण गमावल्याने […]
चंद्रपूर: चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर आज सायंकाळी ६:३० च्या दरम्यान चंद्रपूर वरून बल्लारपूर ला जात असताना दुचाकी गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने एपीजे अब्दुल कलाम गार्डनच्या जवळ अपघात घडल्याची माहिती आहे.
विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुचाकीस्वारांनी मागून सायकल चालकाला धडक दिली. यामुळे दुचाकीचे नियंत्रण गमावल्याने ते दोन्ही व सायकल चालक असे तीन ही इसम या अपघातात जखमी झाले.
महामार्गावर जाणाऱ्या नागरिकांनी या अपघाताग्रस्ताना त्वरित रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH 34 BQ 7603 सदर दुचाकी ही प्रशांत तावाडे यांच्या नावाने नोंद असल्याची प्राथमिक माहिती असून अपघाताग्रस्ताची नावे कळू शकली नाहीत…
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर