नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जाम नदी संगमाच्या परिसरात (कोंढाळी-खापा-केळापूर) राख विसर्जन घाट बांधण्याची मागणी संगम परिसरात जाण्यासाठी जोड़ रस्ता बांधण्याची मागणी

Summary

कोंढाळी – मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर करण्यात येणारा राख विसर्जन हा धार्मिक विधी आहे.चितेमध्ये जाळलेल्या मृत व्यक्तीची अस्थी व राख पाण्यात विसर्जित करणे शास्त्रानुसार नद्यांमध्ये विशेषत: संगमाच्या ठिकाणी राख विसर्जित करणे पवित्र मानले जाते. कोंढाळी/केळापूर/खापा येथील त्रिवेणी संगमावर राख विसर्जन घाट […]

कोंढाळी – मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर करण्यात येणारा राख विसर्जन हा धार्मिक विधी आहे.चितेमध्ये जाळलेल्या मृत व्यक्तीची अस्थी व राख पाण्यात विसर्जित करणे शास्त्रानुसार नद्यांमध्ये विशेषत: संगमाच्या ठिकाणी राख विसर्जित करणे पवित्र मानले जाते. कोंढाळी/केळापूर/खापा येथील त्रिवेणी संगमावर राख विसर्जन घाट बांधण्याची मागणी* कोंढाळी व आजूबाजूच्या परिसरातील मृतांचे नातेवाइकांकडून अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थि व राख गोळा केली जाते, व ही राख रामटेक, अंभोरा, कौंडण्यपूर, सोनपूर जाम मध्यम प्रकल्पात किंवा प्रयाग राज ला जाऊन राख विसर्जित केली जाते.
*जाम नदी संगम क्षेत्र विकसित व्हावे* कोंढाळी-केळापूर-खापा परिसरातच कोंढाळी-कडून केळापूर-सलाई (बु) दिशेला उत्तरेकडे वाहणाऱ्या जाम नदी आणि बहिरबाबा देवस्थानासामोरून, नांदोरा – खापा- कडून सालई कडे पूर्व दिशेला वाहणाऱ्या नदीचा पवित्र संगम. -(केळापूर)- कोंढाळी-खापा गावाच्या संगमावर एक संगम आहे. धर्मग्रंथातील धार्मिक परंपरेनुसार दोन नद्यांचा संगम मृत्यूनंतर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी पवित्र स्थान मानले गेले आहे. या करिता कोंढाळी लगतच्या संगमाला अत्याधुनिक सुविधा मिळून देऊन, या संगम घाटाकडे जाण्यासाठी अप्रोच रोड चे (जोड़रस्त्याचे) बांधकाम काम करून निधी मंजूर करावा, अशी मागणी श्रीक्षेत्र बहिरमबाबा देवस्थान कमेटीने व कोंढाळी भागातील रहिवाशांनी केली आहे.
प्रवेश रस्ता बांधण्याची मागणी श्री क्षेत्र बहिरमबाबा देवस्थानासमोरून वाहणाऱ्या जाम नदीच्या संगमापर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जि प बांधकाम विभागाकडू अप्रोच (जोड)रस्ता तयार करण्याची मागणी ही श्री क्षेत्र बहिरमबाबा देवस्थान कमेटी कडून नांदोरा- खापा ग्रामपंचायत सरपंच देवेंद्र मरसकोल्हे व ग्रामसचिव देवेंद्र उमप यांना तसेच आमदार चरणसिंग ठाकूर यांना निवेदन देऊन येथील जाम नदी संगम घाट
व राख विसर्जन घाट तसेच अप्रोच रोड बांधकामासाठी आवश्यक विकास निधी मंजूर करावा. अशी मागणी येथील श्री क्षेत्र बहिरमबाबा देवस्थानचे समितीचे अध्यक्ष रमेशराव गिरडकर, उत्तमराव गिरडकर गजाननराव शेंडे, प्रभुदयाल शर्मा, निरंजन अंतुरकर, वीरेंद्रसिंग व्यास, कृष्णराव भांगे, राजेंद्रसिंह जाधव, हरिभाऊ वैद्य, प्रकाश राव काळबांडे, रमेश वंजारी, दुर्गाप्रसाद पांडे, बाल किसन पालीवाल, ब्रजेश तिवारी, निम्मत पाटील ठवले, नरेश राऊत, मोहनराव ठवळे, नरेश राऊत नरेश सेंगर, प्रमोद चाफले, सुरेश वंजारी, सुभाष गुप्ता, प्रमोद आष्टणकर, बाबाराव, तसेच कोंढाळी‌ व यांच्यासह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *