BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अग्रेसर विशेष लेख

Summary

भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची मानांकन नोंद आहे, जी भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे. भारतामध्ये एकूण 200 […]

भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची मानांकन नोंद आहे, जी भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे. भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये 38 कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात एकूण ३८ कृषी व फलोत्पादन पिके/उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यास भोगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते. पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करुन विक्री केल्यास उत्पादकास अधिकची किंमत मिळते. राज्याला लाभलेले वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व नैसर्गिक जैवविविधतेमुळे नवीन कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यास प्रचंड वाव आहे. देशातील नवीन पिकास भौगोलिक मानांकन अदा करण्याची कार्यवाही चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री येथून करण्यात येते.

राज्यात भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाचे अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येते. सन २०१९-२० अखेर १२३२ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली होती. संचालक फलोत्पादन  विभागामार्फत उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याने सन २०२४ अखेर ११४२३ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली आहे. कृषी उत्पादनाच्या देशात एकूण झालेल्या उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा ६१ % वाटा आहे. तसेच ५००० प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळून अधिकृत वापरकर्ता नोंदणीत मोठी वाढ होणार आहे.

अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात, अशा नोंदणी करत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते, त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरणार आहे.

 

भौगोलिक मानांकन कृषी उत्पादनांचे अधिकृत वापरकर्ता सद्य:स्थिती

अ.क्र.जिल्‍हापिकांचे नांवसंस्‍थेचे नांव व पत्तासमाविष्‍ठ जिल्‍हेअधिकृत वापरकर्ता संख्‍या1पालघरडहाणू घोलवड चिकूमहाराष्‍ट्र राज्‍य चिक्कू  उत्‍पादक संघ, रघुवीर सदन मु- कंक्राडी, पो- वाकी, ता-डहाणू, जिल्हा: ठाणे – ४०१६०२पालघर842पालघरबहाडोली जांभूळबहडोली जांभूळ उत्पडक शेतकरी गट, बहाडोली मु. बहडोली मु.पो. दहिसर, तालुका जिल्हा पालघर- 401 102पालघर03ठाणेबदलापूर जांभूळजांभूळ परिसंवर्धन आणि समुद्र विकास चॅरिटेबल ट्रस्ट,   राधेया अपार्टमेंट, A/3, पहिला मजला, गोळेवाडी, बदलापूर -421 503ठाणे०4रायगडअलिबाग पांढरा कांदाअलिबाग पांढरा कांदा उत्पादक संघ अलिबाग, तालुका: अलिबाग, जिल्हा: रायगड – 402 201रायगड०5सिंधुदुर्गवेंगुर्ला काजूकोकण काजू समुह, सिंधुदुर्ग, गोपुरी आश्रम, वागदे, ता- कणकवली जिल्हा: सिंधुदुर्ग – ४१६ ६०२,सिंधुदुर्ग1196सिंधुदुर्ग व रत्‍नागिरीसिंधुदुर्ग व रत्‍नागिरी कोकमसिंधुदुर्ग व रत्‍नागिरी महाकोकम संघ. मासाडे  ता. मालवन

मसाडे विराण बाजार, तालुका: मालवण, जिल्हा: सिंधुदुर्ग – 416 606

सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी387रत्‍नागिरीकोकण हापूससंशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तालुका, दापोली जि., रत्नागिरी – ४१५ ७१२,रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर1796

8पुणेपुरंदर अंजिरमहाराष्‍ट्र अंजीर उत्‍पादक संघ, पुणे

50 ए हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट पुणे ४११०१३

पुरंदर तालुका  (पुणे)5129पुणेआंबेमोहर तांदुळमुळशी तालुका आंबेमोहर संवर्धन संघ,केचरे, ता-मुळशी  जि-पुणेमुळशी  तालुका    (पुणे)11110सोलापूरसोलापूर डाळिंबअखील महाराष्‍ट्र डांळिब संघ,पुणे

E-15, निसर्ग, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे- 411037

सोलापूर176611सोलापूरमंगळवेढा ज्‍वारीमालंदाडी ज्‍वारी विकास संघ,मंगळवेढा ता- मंगळवेढा जि-सोलापूरता.- मंगळवेढा  (सोलापूर)2512कोल्‍हापूरअजरा घनसाळ राईसअजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, रामदेव गल्ली, आजरा जि-कोल्‍हापूरकोल्‍हापूर24313कोल्‍हापूरकोल्‍हापूर गूळकोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समिती, श्री.शाहू मार्केटयार्ड, कोल्‍हापूर ४१६००५कोल्‍हापूर714सांगलीसांगली हळदसांगली हळद क्‍लस्‍टर प्रा. लि.

१ला मजला, शिव मंडप, राम मंदिर चौक, मिरज-सांगली रोड, सांगली, ४१६ ४१६

सांगली39615सांगलीसांगली बेंदाणामहाराष्‍ट्र राज्‍य द्राक्ष बागायदार संघ,  द्राक्ष भवन, 117, वसंत मार्केट यार्ड, सांगली, ता- मिरज, सांगली – ४१६सांगली१६३०16सातारावाघ्‍या घेवडाजय तुळजाभवानी शेतकरी बचत गट, देऊर  ता-कोरेगाव जि-सातारासातारा18917सातारामहाबळेश्वर स्ट्रॉबेरीश्रीराम फ्रुट्स प्रक्रिया  सह. सोसायटी. महाबळेश्वर मु.पो. भिलार, ता- महाबळेश्वर जिल्हा -सातारा,सातारा15118नाशिकनाशिक द्राक्षनाशिक द्राक्ष शेतकरी सोसायटी,

नाशिक ग्रेप फार्मर्स सोसायटी, शिव प्रसाद, चौक, इंदिरा नगर, बंद: मुंबई आग्रा रोड, नाशिक – ४२२ ००९

नाशिक32919नाशिकनाशिक व्हॅली वाईनराष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व नाशिक व्हॅली वाईन उत्पादक संघनाशिक1

20नाशिकलासलगाव कांदाबळीराजा शेतकरी गट, नाशिक

कोटमगाव रोड, लासलगाव, निफाड तालुका, नाशिक  ४२२ ३०६

नाशिक150२१जळगावजळगाव केळीनिसर्ग राजा कृषी विज्ञान केंद्र, तांदळवाडी, ता-रावेर जळगांवजळगाव११७८22जळगावजळगाव भरीत वांगीनवनिर्मिती शेतकरी मंडळ असोडा, ता-असोदा जिल्हा- जळगांवजळगाव2123नंदुरबारनवापूर तुरडाळबळीराजा कृषक  बचत गट धनरत, ता-नवापूर जिल्हा- नंदुरबारनंदुरबार6124नंदुरबारनंदूरबार आमचूरअमु आखा एक से फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चोंदवडे, ता- धडगाव, नंदुरबार – 425 414नंदुरबार०25नंदूरबारनंदूरबार मिरचीडॉ.हेडगेवार सेवा समिती  डॉ.हेडगेवार भवन, जयवंत चौक, नंदुरबार,नंदूरबार०26जालनाजालना मोसंबीजालना जिल्‍हा मोसंबी उत्‍पादक संघ,जालना C/o प्रगत शेतकरी केंद्र, सुभाष रोड, मामा चौक, जिल्हा- जालना 431 203जालना124027जालनाजालना दगडी ज्वारी

जय किसान शेतकरी गट, मात्रेवाडी  ता -बदनापूर जिल्हा-जालना  431202जालना०28बीडबीड सिताफळबालाघाट सिताफळ संघ, धारुर,बीड तळेगाव, तालुका- धारूर, जिल्हा- बीड – ४३११२४बीड००29छ.संभाजी  नगरमराठवाडा केसरआंबा उत्‍पादक संघ, छ.संभाजीनगर

अजय अभियांत्रिकी कंपनी परिसर, 5-14-42, अदालत रोड, औरंगाबाद – 431005

छ.संभाजीनगर बीड जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड41३0लातूरपान चिंचोली चिंचपानचिंचोली  पाटाडी चिंच उत्पादक संघ पो.पानचिंचोली, तालुका- निलंगा,  जिल्हा -लातूरलातूर 

३१लातूरबोरसुरी डाळ

बोरसुरी तूरडाळ उत्तपादक संघ

पो. बोरसुरी, तालुका- निलंगा, जि-लातूर

लातूर०३२लातूरकाष्टी कोथिंबीर

कास्ती कोटिंबीर शेतकरी उत्पादक संघ पोस्ट: आशिव, तालुका: औसा, लातूरलातूर०३३धाराशिवकुंथलगिरी खवाभौगोलिक वैविध्य संवर्धन संघ, अंबरखाने निवास, गणेश नगर, नई आबादी, उदगीर जि-लातूर ४१३ ५१७धाराशिव०३४हिंगोलीबसमत हळदी (हळद)मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, गट क्र. 174/1, तालुका कृषी कार्यालय, वसमत, तालुका: वसमत, जिल्हा: हिंगोली – 431 512हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला वाशीम०३५नागपूरभिवपुरी लाल मिरचीभिवपुरी मिरची उत्पादक संघ, भिवापूर

चिखलपार, तालुका: भिवापूर जिल्हा -नागपूर ४४१२०१

नागपूर२०३६वर्धावायगाव हळदवायगाव हळद उत्पादक संघ

वायगाव तालुका- समुद्रपूर, जिल्हा – वर्धा- 442101

वर्धा६९३७भंडाराभंडारा चिन्नोर भातभंडारा चिन्नोर धन उत्पादक संघ

मु/पो- आसगाव, ता. पौनी, जि. भंडारा, ४४१९१०

भंडारा०३८नागपूरनागपूर संत्राफलोत्पादन विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलानागपूर1246एकूण अधिकृत वापरकर्ता संख्‍या – महाराष्ट्र भारत – 19625११४२३

(६०%)

 

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *