उर्जानगर वसाहती मध्ये श्री गजानन महाराज प्रगट दीन उत्साहात साजरा

चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर/उर्जानगर
चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या उर्जानगर वसाहती मध्ये दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२४ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यामधे प्रभू श्री राम कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याचे कथा निरूपणकार ह भ प श्री विवेकानंद नवघरे महाराज व च.म.औ.वि.केंद्राचे माननीय मुख्य अभियंता श्री गिरीश कुमरवार साहेब सपत्नीक यांचे हस्ते कलश स्थापनेने विधिवत सुरुवात करण्यात आली .या कालावधीत दररोज सकाळी काकड आरती, श्री राम कथा,श्री गजानन विजयग्रंथ सामूहिक पारायण व सायंकाळी सांप्रदायिक हरिपाठ,प्रभू श्री राम कथा,आरती अशा दैनदिन नित्यक्रमाने साजरा करण्यात आला. श्रीराम कथेमधे सातही दिवस लहान मुलांनी प्रभू राम व केवट भेट,श्रीराम लक्ष्मण शबरी भेट,सुग्रीव वाली भेट,हनुमान श्रीराम भेट यांच्या वेशभूषा करून कथेमध्ये उत्तम सादरीकरण केले व याचा सर्व ऊर्जानगर वासियांनी आनंद घेतला. रविवार दिनांक ३ मार्च श्री संत गजानन महाराज प्रगटदिनी महाराजांच्या पालखीची सकाळी आठ वाजता ऊर्जानगर परिसरामधे भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर दुपारी ठीक १२ वाजता काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मा.मुख्य अभियंता श्री गिरीश कुमरवारसाहेब उपस्थित होते,तसेच सर्व मा.उपमुख्य अभियंतासाहेब,सर्व मा अधीक्षक अभियंतासाहेब,मा कल्याण अधिकारीसाहेब व इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
हा सोहळा श्री हनुमान मंदिर संस्थान ऊर्जानगरचे विश्वस्त अध्यक्ष सुनील भुयार,उपाध्यक्ष जगदीश परडखे, सचिव युवराज बोंद्रे, कोषाध्यक्ष सुरेश सोनवणे व सदस्य अरुण पोहरे ,नरेश बनसोड, प्रभाकर उमप,विनोद ठेंगडी संतोष पटेल, प्रमोद राठोड, हितेश वासनकर,संदीप बोदडे,आशिष लेकुरवाळे आणि डेकोरेशन आणि मंदिर सजावट चे काम श्री दिगंबर भाऊ इंगळे यांनी केली तर रांगोळ्या आणि पालखीची शोभा ऊर्जानगर मधील महिला भगिनी यांनी वाढविली.यामध्ये सर्व ऊर्जानगर वासियांनी तन-मन-धनाने पुढाकार घेऊन हा सोहळा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.