कृषी शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे बांधावर
Summary
कोंढाळी – वार्ताहर प्रत्यक्ष बांधावर शेतकरी कृषी शास्त्रज्ञ मंचची शेतकऱ्यांचे बांधावर बैठक कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथील कृषी विज्ञानाचे वैज्ञानिक व शेतकरी मंडळाची बैठक मासोद येथील […]

कोंढाळी – वार्ताहर
प्रत्यक्ष बांधावर शेतकरी कृषी शास्त्रज्ञ मंचची शेतकऱ्यांचे बांधावर बैठक
कोंढाळी -वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथील कृषी विज्ञानाचे वैज्ञानिक व शेतकरी मंडळाची बैठक
मासोद येथील अतिप्राचीन पौराणिक व ऐतिहासिक तसेच भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचे रामगड शिव गुंफेच्या सभा गृहात घेण्यात आली. या प्रसंगी कृषी शास्त्रज्ञ्यांनी येथील शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर पोहचून. शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ मंचची गरज, कार्य आणि भविष्यात करावयाच्या कामांची माहिती या वेळी देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्रच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात. त्याच अनुषंगाने शुक्रवार २९फेब्रूवारी रोजी शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ
मंच बैठक झाली. या वेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ उद्यानविद्यावेक्ता डॉ. मेघा डहाळे, किटक शास्त्रज्ञ डॉ.प्रदिप दवने, रोग शास्रज्ञ डॉ ऐकता बागडे,सहायक उद्यान वक्ता डॉ योगेश धार्मिक, तसेच एस.आर.ए. रमेश घाडगे, सचिन पोटकिल्ये शाम पतिंगे, कृषी सहायक धनराज धरममाळी, काटोल तालुका कृषी सहायक , आदी कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते. या वेळी डॉ. मेघा डहाळे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची गरज, कार्य आणि भविष्यात करावयाच्या कामांची माहिती दिली. किटक शास्त्रज्ञ डॉ प्रदिप दवने यांनी संत्रा,मोसंबी या फळ पीका वरिल येणारा रोग, नवतीपानगळ , झाडे पिवळी पडण्याची कारणे,कोळसी,अंबीया, मृग , हस्त बहार व्यवस्थापना सह शेत पीकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापना बाबद माहिती दिली, रोग शास्रज्ञ डॉ ऐकता बागडे यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती करण्याच्या पद्धती बाबद मार्गदर्शन करताना सांगितले की, डिंक्या संत्रा मोसंबी फळ बागा पिकातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. खतांचे वापर, खतांचे नियोजन,तसेच
एकात्मिक पद्धतीने किडीचे नियंत्रण केल्यास किडीवर नियंत्रण करता येऊ शकते असे सांगीतल. नियंत्रण उपाय याविषयी पी. के व्ही चे अंतरंग प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल येथील कृषी शास्त्रज्ञ्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतीशाळा वर्गास पथकाने पिकाविषयी विस्तृत मार्गदशन केले या पाहणी दौरा कार्यक्रमास डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल, तसेच काटोल तालुका कृषी विभाग, कृषी विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र कोंढाळी येथील व शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी येथील प्रगतिशील शेतकरी डॉ हरिभजन धारपूरे यांनी हवामाचे लहरीपणा चा फटका शेतकऱ्यांना बसतो , यावर कृषी शास्त्रज्ञ्यांनी शेतकर्यांना माहिती द्यावी अशी मागणी केली. त्याच प्रमाणे मासोद येथील सरपंच रंजू प्रकाश बारंगे यांनी मासोद भागातील शेतकर्यांच्या समस्या मांडल्या. सोबतच या प्रसंगी उपस्थित शेतकरी भाऊराव धारपूरे, महादेवराव खवसे, व्यंकटराव धारपूरे, प्रकाश बारंगे,गजानन कुळकर्णी, सेवकराम काळे, लक्षमन चोपडे, उमेश ढोले गौतम मेश्राम, देवीदास कालभूत, किरन रबडे, एम बी ढोके,हूकूमचंद चोपडे, अभिजित रबडे, अनिल कालभूत, राजू बारंगे, लखन बारंगे, घनशाम किनेकर, शंकर बारंगे या शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतातील समस्या कृषी शास्त्रज्ञां समक्ष कृषी विषयक अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर कृषी शास्त्रज्ञ्यांनी आप आपल्या विषयासंबंधीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
: *कृषी चिकित्सालयाची मागणी*
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या धोरणानुसार डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठांचे अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल चे कृषी शास्त्रज्ञ कोंढाळी येथील शेतकर्यांचे बांधावर पोहचून शेतीविषयक अडचनी व त्यावर उपाय या करीता प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत योग्य ते मार्गदर्शन केले. या प्रसंगी येथील शेतकरी प्रकाश बारंगे व सुरेंद्र भाजीखाये, दुर्गाप्रसाद पांडे यांनी शेतकऱ्यांचे पीकाचे नियोजन करते वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यात पावसाचा अंदाज, पावसाची वेळ, माती परिक्षण, कुठल्या वातावरण कोणते पीक घ्यायचे, याबाबत वेळीच माहिती मिळणे फार गरजेचे आहे. या करीता शासनाने (कृषी मंत्रालयाने) राज्यातील कृषी मंडळ निहाय अद्य्यावत कृषि चिकित्सालये सुरू करने फारच गरजेचे आहेअसे मत मांडले, व यावर राज्य सरकारने कृषी मंडळ निहाय कृषी चिकित्सालये सुरू करावी अशी मागणी केली. यावर सर्व शेतकऱ्यांनी ही या मागणीसाठी दुजोरा दिला.