कस्तुरी बी.एड.महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिवस थाटात संमपन

पुणे :-कस्तुरी शिक्षण संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिवस बी एड छत्रद्यापक व शिक्षक कडून सरदार वालभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्र वर्णन करून भारतमातेच्या हक्का व कर्तव्ये जोपासण्याबबत प्रतिज्ञा घेण्यात आली .
या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष प्राचार्य संमोहन तज्ज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी बोलताना भारतात विविध धर्म, भाषा , संस्कृती असून एकता कासी साधल्या जाते हे सांगितले छत्रध्यपक आधक्षा
अर्चना जाधव यांनी एकमेकांच्या जाती ,धर्माचा, संस्कृतीचा आदर केला पाहिजे असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ शिल्पा पवार यांनी राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख अतिथी प्रतिभा भुजबळ यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले व राष्ट्रीय एकता दिवस या विषयी विचार मांडून वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा आढावा घेतला.डॉ सौ सातारकर मॅडम यांनी आपल्या अनुभवाचे जोड देऊन उदाहरण दिले, या कार्यक्रमात प्रा संजय राऊत , प्रा निखिल जगताप, प्रा हळदे सर, प्रा सीमा पवार मॅडम, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थी व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सीमा पवार मॅडम यांनी विविधतेत एकता आहे, हे भारताचे वैशिष्ट्य आहे असे सांगून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निशा शिंदे यांनी भारदार शब्दशैली वापरून केले. ज्योती केवल यांनी आभार मानले या कार्यक्रमात बी एड महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .