BREAKING NEWS:
नागपुर हेडलाइन

बोर व्याघ्र‌ प्रकल्प अभयारण्य बफर झोन मासोद -धानोली भागात सफारी गेट ची मागणी….. पशुधन व मानवी सुरक्षिततेसाठी आवश्यक” मासोद-मेट-धानोली या भागात पोषक

Summary

कोंढाळी वार्ताहर- दुर्गा प्रसाद पांडे महाराष्ट्र राज्यात एकूण सहा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून, या पैकी बोर व्याघ्र प्रकल्प वगळता इतर पाच व्याघ्र राखीव क्षेत्राचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र संचालक आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक नियमानुसार व्याघ्रप्रकल्पाचे […]

कोंढाळी वार्ताहर- दुर्गा प्रसाद पांडे

महाराष्ट्र राज्यात एकूण सहा व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून, या पैकी बोर व्याघ्र प्रकल्प वगळता इतर पाच व्याघ्र राखीव क्षेत्राचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र संचालक आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक नियमानुसार व्याघ्रप्रकल्पाचे बफर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण असने आवश्यक आहे. बोर व्याघ्र‌ अभयारण्य बफर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रणातंर्गत ‌ बोर अभयारण्य बफर झोन क्षेत्राला नागपूर प्रादेशिक वनविभाग -व-वर्धाप्रादेशिक वन विभागाचे सीमेलगत चे कोंढाळी वनपरिक्षेत्र व कारंजा (घा) वनपरिक्षेत्रालगतचे बफर झोन लगतच्या भागात बोर व्याघ्र‌ अभयारण्यातून कोढाळी‌ व कारंजा वनपरिक्षेत्रालगतचे गावांतील शेतकरी नागरिक व गोपालकांचे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात पशुधन हाणी होत आहे सोबतच आता पर्यंत पाच नागरिकांना वाघाने आपले भक्ष्य बनविले आहे. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‌नवीन बोर बफर झोन भागातील मासोद – कामठी – किंवा धानोली -मेट या गावालगत (जेथे ही पोषक वातावरण असेल)या भागात
सफारी गेट देण्यात यावे.अशी मागणी स्थानिकांची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर वन विभागाचे १३५९.७५ चौ कि. मी. क्षेत्रामधून बोर व्याघ्र‌ अभयारण्य एकसंघ नियंत्रणासाठी ८८.४३ चौ .कि मी. वनक्षेत्र हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली आहे.
बोर व्याघ्र अभयारण्य राखीव कोअर क्षेत्र १३८.१२चौ. कि. मी.- (१३८१२.१४हे आर),बफर क्षेत्र ६७८.१५चौ .कि.मी.(६७८१४.४५९हे आर), एकूण -८१६.२७ चौ.कि.मी(८१६२६.हे आर)असे बोर व्याघ्र एक संघ भागांपैकी उत्तर भागात सफारी गेट दिल्यास या भागातील पशुधन हानी,मनुष्य जीव हानी नियंत्रनात येईल. सोबत च या भागातील युवकांना सफारी अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो.
*नवीन बोर अभयारण्यासाठी सफारी गेटची मागणी*
कोंढाळी वनपरिक्षेत्र बोर अभयारण्याला लागून असल्याने मासोद, कामठी, धोतीवाडा, खापा, चिखली, खैरी, बोरगाव, धुरखेडा, बोपापूर, धामणगाव, खापरी, जामगढ, जुनापाणी, अहमदनगर, चिंचोली, हेटी, मिनीवाडा, म्हसळा, मलकापूर, बोरगाव, बोरगाव या वनक्षेत्राला लागून आहे. , शेकापूर आणि लगतची गावे कोंढाळी वनपरिक्षेत्रात वसलेली आहेत. या परिसराला लागून असलेल्या गावाजवळील जंगलात बिबट्या आणि एक वाघ असे दोन वाघ सतत फिरत असतात. या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना वाघांनी लक्ष्य केल्यानंतर येथील रामगड डोंगर परिसरात त्यांनी आपला तळ ठोकला. सध्या शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी शेतात जातात, मात्र या भागात वाघांकडून वारंवार प्राण्यांवर हल्ले होत असल्याने शेतकरी वाघाच्या भीतीने जगत आहेत. कोंढाळी वन परिक्षेत्रांतर्गत एका वर्षात ६९ते ७२जनावरांना आपले भक्ष्य बनविले आहे. तर कारंजा वनपरिक्षेत्रालगतचे गावांतील पाच मनुष्य जीवाला भक्ष्य बनविले आहे. बोर अभयारण्याचा कोंढाळी वनपरिक्षेत्राशी संबंध असल्याने या भागात वाघाचे मोठे हाल होत आहेत. धानोली परिसरात तेच. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी-मसोद- व वर्धा जिल्ह्यात कारंजा वनपरिक्षेत्रातील धानोली-मेट भागात 🐅
नवीन बोर अभयारण्याचा सफारी मार्ग झाल्यास बोर अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल आणि कोंढाळी, कारंजा (घा) आणि कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, मेंढपाळांवर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात कमी होतील. यासाठी धानोली येथील शेतकरी अनुराग रोटकर, कोंढाळीचे सरपंच केशवरवधुर्वे, उपसरपंच स्वप्नीलसिंग व्यास, भास्करराव पराड, नीळकंठराव ढोरे‌ ब्रजेश तिवारी, राजेंद्र खामकर, दुर्गा प्रसाद पांडे, यांच्या सह रामदास मरकाम, रमेश चव्हाण, नरेश नागपुरे, आकाश गजबे, प्रशांत खंते, नितीन ठवळे,पवन पेंदाम, राष्ट्रपाल पाटील, सतीश ‌चव्हान, रवी जयस्वाल, प्रकाश बारंगे, पदम पाटील डेहणकर,विठ्ठल ऊके,‌नागोराव हिंगवे, राजू किणेकर, बबलू बिसेन,अंसार बेग,राहूल डोंगरे, राजकुमार चोपडे, धम्मरक्षित वाहने,धनराज ढोबळे, गुणवंत खवसे, उत्तम काळे,रवी साठे, यांनी मासोद व धानोली परिसरात नवीन बोर अभयारण्यासाठी सफारी गेट उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक श्रीमती लक्ष्मी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या बाबतीत वन्य जीव संरक्षण नियंत्रण अभयारण्या अंतर्गत अभ्यास केल्यावर या भागात पोषक असल्यास सफारी गेट चा विचार होऊ शकतो असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *