BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

पवनी-आसगांव रोडवरील सेंद्रि कडे जाणाऱ्या रस्त्यालगत पुलावर बॅरिगेट केव्हा लागणार

Summary

आसगाव:- प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पुलावर लवकरात लवकर बॅरिगेट्स लावावे कोणतीही अनुचित प्रकारची घटना घडू नये त्यासाठी वेळीच उपाययोजना करावी:- शेखर पडोळे, पंचायत समिती सदस्य पवनी. पावसाळ्याला सुरुवात झाली असून पवनी ते लाखांदूर मुख्य रोडवरील आसगाव येथील सेंद्रिकडे जाणारा रस्त्यालगत […]

आसगाव:- प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पुलावर लवकरात लवकर बॅरिगेट्स लावावे कोणतीही अनुचित प्रकारची घटना घडू नये त्यासाठी वेळीच उपाययोजना करावी:- शेखर पडोळे, पंचायत समिती सदस्य पवनी.
पावसाळ्याला सुरुवात झाली असून पवनी ते लाखांदूर मुख्य रोडवरील आसगाव येथील सेंद्रिकडे जाणारा रस्त्यालगत पुलावर कठडे किंवा रेलिंग लावले नसल्यामुळे तिथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जवळच लागून सरस्वती विद्यामंदिर शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लहान मुलांना शाळेत रोज जाणे-येणे करावे लागते.
नुकत्याच आसगाव चौक येथील मागील वर्षीच्या घटना ताजी असतानाच जिल्हा परिषद शाळा आसगाव येथील एक विद्यार्थ्याचा नाल्याच्या पुलावर बॅरिगेट नसल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात रस्ता क्रॉस करत असताना वाहून गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या या ठिकाणी अनेक घटना घडल्या असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे घटना पुन्हा घडू नये यासाठी लवकरात लवकर नाल्याच्या पुलावर बॅरिगेट लावण्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *