वेणानदी शोधयात्रेला ‘वेध’ कडून चौकीगड येथून प्रारंभ वेध प्रतिष्ठान, नागपूर चा उपक्रम वेणानदी शोधयात्रेला भवानी माता मंदिर, चौकीगड येथून शुभारंभ
Summary
प्रतिनिधी/२८ कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे वेणा नदी शोधयात्रा उपक्रमाला नुकताच वेणा नदीचे उगमस्थान भवानी माता मंदिर, चौकीगड येथून शुभारंभ करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे उदघाटक म्हणून संपादक प्रमोद काळबांडे तर प्रमुख […]

प्रतिनिधी/२८
कोंढाळी – दुर्गा प्रसाद पांडे
वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे वेणा नदी शोधयात्रा उपक्रमाला नुकताच वेणा नदीचे उगमस्थान भवानी माता मंदिर, चौकीगड येथून शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे उदघाटक म्हणून संपादक प्रमोद काळबांडे तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खामकर, वेधचे अध्यक्ष डॉ.मनोहर नरांजे, भारतीय पुरातत्व विभागाचे जिगामीथ नामग्याल, साहित्यिक कल्पना नरांजे प्रामुख्याने उपस्थित होते.
वेध प्रतिष्ठान नागपूरतर्फे काटोल तालुक्यातील भवानी माता मंदिर,चौकीगड येथून उगम पावणाऱ्या आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगीसंगम येथे वर्धा नदीला मिळणाऱ्या वेणा नदीचा अभ्यास करण्यासाठी वेणा नदी शोधयात्राचे आयोजन केले आहे. मानवी संस्कृतीचा उगम आणि विकास नद्यांच्या साथीने आणि त्यांच्या सानिध्यातच झाला आहे. पण विकासाच्या विपरीत व्याख्येमुळे या नद्यांचा जीवनप्रवाह विषाक्त झालेला आहे. नदी म्हणजे जणू लोकमाताच आहे या शोधयात्रेत स्थानिक इतिहास, संस्कृती, प्रकृती, पर्यावरण, भाषा, लोकजीवन, समारंभ, उद्योग, शिल्प, स्थापत्य, कला इत्यादी अंगांनी अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व संशोधक डॉ.मनोहर नरांजे यांनी दिलेली आहे.
कार्यक्रमात प्रास्ताविक वेधचे सचिव खुशाल कापसे संचालन डॉ.अश्विन किनारकर तर आभार प्रदर्शन वेधचे उपाध्यक्ष वसंत गोमासे यांनी मानले.कार्यक्रमाला भारतीय पुरातत्व विभागाचे कारतीम मुथालायर,पक्षी अभ्यासक डॉ.लोकेश टीमगिरे, राजेंद्र पाटील, ओंकार पाटील, शंकर जीवनकर,कृष्णा चावके, रुपेश राठोड, घनश्याम भडांगे,एकनाथ खजुरीया, मारोती मुरके,धनंजय पकडे,निलेश वाघ व राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स
निसर्गाच्या कुशीत लज्जागौरीची मुर्ती
नवजीवनाची जननी म्हणून लज्जागौरी देवीला ओळखल्या जाते.भवानी माता परिसरात मध्ययुगीन प्राचीन लज्जागौरीचे शिल्प आहे.देवीच्या निर्मितीक्षम सृजनशील अंगाचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे पुराणतत्व संशोधक डॉ.मनोहर नरांजे यांनी सांगितले.