BREAKING NEWS:
अहमदनगर भंडारा महाराष्ट्र रोजगार विज्ञानं-तंत्रज्ञान शिक्षण हेडलाइन

ज्येष्ठ संमोहन तज्ञ प्राचार्य डॉ जगदीश राठोड यांची वरठी येथून थेट अहमदनगरला दूरध्वनीवरून घेतलेली मुलाखत

Summary

अमर वासनिक/न्युज एडिटर प्रश्न १ आपले पूर्ण नाव, टोपण नाव, जन्मतारीख, छंद, शिक्षण, संमोहन विज्ञान मध्ये कधी पासून जिज्ञासा निर्माण झाली. वयाच्या कितव्या वर्षापासून संमोहनशास्त्राचे अध्ययन सुरू केले. उत्तर:- संमोहन तज्ञ डॉ जगदीश राठोड मूळ रहिवासी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका […]

अमर वासनिक/न्युज एडिटर

प्रश्न १ आपले पूर्ण नाव, टोपण नाव, जन्मतारीख, छंद, शिक्षण, संमोहन विज्ञान मध्ये कधी पासून जिज्ञासा निर्माण झाली. वयाच्या कितव्या वर्षापासून संमोहनशास्त्राचे अध्ययन सुरू केले.

उत्तर:- संमोहन तज्ञ डॉ जगदीश राठोड मूळ रहिवासी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका शिरपूर येथील ग्रामीण भागातून अथक परिश्रमाने शिक्षण घेऊन प्राथमिक नंतर माध्यमिक नंतर उच्चशिक्षण नागपूर येथे पूर्ण केले. व त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रथम मानसशास्त्राच्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले व त्यानंतर संमोहनाविषयीचे प्रशिक्षण घेतले आणि त्या प्रशिक्षणात संमोहन व मानसशास्त्र विषय घेऊन पीएचडी केली. त्यानंतर विविध ठिकाणी संपूर्ण भारतात संमोहन स्टेज शो द्वारे जनजागृती, मनोरंजन व प्रबोधन जनसामान्य जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. त्याचबरोबर कित्येक मनाशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांची सुद्धा संमोहनद्वारे उपचार केले. व सोबत सोबतच एमडी इन सायको थेरपी व हीपनोटिजम बाबत चे चिकित्सक अर्थात डॉक्टर म्हणून सुद्धा डिग्री घेतली व
संपूर्ण भारतात मनोरंजनाचे स्टेज शो घेत असताना विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर घेत असताना त्या प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास , स्मरण शक्ती विकास , ताणतणाव दूर करणे, याबाबतच्या कार्यशाळा घेतल्या. तसेच वेळेचे नियोजन स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक कौशल्य विकास याबत चे सुद्धा कार्यशाळा घेतल्या तसेच ‘माईंड मनेजमेंट इज द लाईफ मॅनेजमेंट’ या विषयावर सातत्याने मार्गदर्शन अर्थात मोठ मोठ्या कार्यशाळा घेत असतो. या माध्यमाने कित्येक व्यक्तींच्या अंतर्मनापर्यंत पोहोचून अंतर्मनाचे दालन उघडे केले. व त्यामुळे कित्येक व्यक्ती ताण तणाव विरहित जीवन जगायला सक्षम झाले. त्याचबरोबर संमोहनाविषयीचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले. संमोहन हे जादू, मंत्र, भूत, भानामती नसून ते एक शास्त्र आहे, एक विज्ञान आहे, मानस शास्त्रातील एक भाग आहे. त्याचबरोबर संमोहन एक कला म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो.
संमोहनाचे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा फार मोठे उपयोग आहेत. आपल्या मधील हिडन टॅलेंट किंवा सुप्त कला गुणांचा विकास केला जातो.

प्रश्न २. संमोहन या शब्दाचा अर्थ काय होतो. संमोहनाचे प्रकार किती व कोणते. संमोहन कला चष्मा वापरणारे लोक शिकू शकतात काय. संमोहन कला अपंग लोक शिकू शकतात काय.

उत्तर:- संमोहन म्हणजे हे एक मानसशास्त्रातील थेरपी आहे. संमोहनाची व्याख्या म्हणजे एका संमोहन कर्त्यानी संमोहित होणाऱ्या व्यक्तीवर सुचनेच्या प्रभावानी ताबा मिळवणे होय. संमोहनाचे प्रकार हे १. स्वसंमोहन, २. पर-संमोहन असे दोन प्रकार पडतात. स्व-संमोहन म्हणजे स्वतःच स्वतःला सूचना देऊन स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवल्या जाते व बाह्य मन निद्रस्त होऊन आंतर-मन क्रियाशील होते. त्यात महत्वाचे म्हणजे संमोहित होण्यासाठी तीन बाबी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे इच्छाशक्ती, एकाग्रता व सूचनेचे पालन या तीन गोष्टीच्या माध्यमातून संमोहन प्रक्रिया सुरू होते. पण संमोहनामुळे कोणाचेही दुरुपयोग होत नाही. दृष्टीने अपंग व्यक्ती संमोहन दुसऱ्यावर करू शकत नाही. पण स्वतःसाठी उपयोग करू शकतो. संमोहन सुचनेशी संबंधित आहे चशम्याशी संबधित नाही. अपंग व्यक्ती सुद्धा संमोहन शिकू शकतात.

प्रश्न ३ त्राटक मेडीटेशन म्हणजे काय. त्राटक साधना कशी करतात व त्राटक साधनेचे प्रकार किती व कोणते.

उत्तर:- संमोहनात त्राटकाचे खूप महत्व जरी नसले तरी मनाच्या एकाग्रतेसाठी त्राटक हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्राटक करत असताना त्राटकाचे विविध प्रकार पडतात. बिंदू त्राटक , चक्र त्राटक , ज्योती त्राटक , मूर्ती त्राटक, सूर्य त्राटक, प्रतिबिंब त्राटक, अग्नी त्राटक, ईत्यादी त्राटकाचे प्रकार पडतात.

प्रश्न ४. संमोहन शास्त्राचा उपयोग विविध आजार बरे करण्यात होऊ शकतो काय. शारीरिक आजार देखील बरे होऊ शकतात काय.

उत्तर :- मानसिक आरोग्य व शरीराशी संबंधित काही आजार संमोहनाद्वारे सहज दूर केल्या जातात.

प्रश्न ५. मूर्ती त्राटक म्हणजे काय होते. काय आपणांस मूर्ती त्राटकाचे प्रयोग करता येतात काय. मूर्ती त्राटक विद्येचा दुरुपयोग होतो काय. कसा.

उत्तर:- मूर्ती त्राटक म्हणजे एखाद्या मूर्तीकडे एकाग्र होऊन किंवा लक्ष केंद्रित करून मनाच्या वैचारीक स्थितीची शून्य अवस्था गाठणे. होय मला मूर्ती त्रकाचे प्रयोग करता येतात. मूर्ती त्राटक विद्येचे दुरुयोग होत नाही.

प्रश्न ६. समोहन कलेचा उपयोग समाजसेवेसाठी केला जाऊ शकतो काय. आपण काय काय समाज सेवा करता.

उत्तर:- संमोहन शास्त्राचा उपयोग समाजसेवेसाठी केल्या जातो. तसेच मानसिक ताण तणाव टेन्शन दूर केल्या जाते. समाजातील उद्बोधन प्रबोधन व सुप्त कला गुणांचा विकास केला जातो.

प्रश्न ७. संमोहन विद्येमुळे कित्येक कमजोर विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलू शकते काय. त्यांच्या गुणवत्तेचे प्रमाण वाढू शकते काय. आपण कोणकोणते कार्य विद्यार्थ्यांसाठी राबवता?

उत्तर:- होय; कित्येक व्यक्तिमत्व विकास होते , मनातील भीती घालवल्या जाते. निद्रानाश दूर केल्या जातो. भास व भ्रम दूर केल्या जातो. काल्पनिक आजार , न्यूनगंड, असे कित्येक आजार दूर केले जातात. परीक्षेची भीती घालवल्या जाते. चीड चीडेपण दूर होते. गुणवत्तेचे प्रमाण वाढू शकते, गायन नृत्य वादन सारखे कौशल्य विकास साध्य होते इत्यादी कार्य राबवल्या जातात.

प्रश्न ८. बिंदू त्राटक मेडीटेशन म्हणजे काय. ते कसे करतात. व त्याने काय साध्य होते.

उत्तर:- बिंदू त्राटक म्हणजे एखाद्या बिंदुकडे टक लावून बघत राहणे व मनातील विचारांवर नियंत्रण आणणे. त्याने मनातील भीती दूर होते. आत्मविश्वास वाढवल्या जातो, आणि अंतर्मनाला विविध प्रकारच्या सूचना देऊन आपल्यात परीवर्तन घडवून आणू शकतो.

प्रश्न ९. दिव्य दृष्टी म्हणजे काय होते. हा काय प्रकार आहे. आपल्याजवळ दिव्य दृष्टी आहे काय.

उत्तर:- दिव्य दृष्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीला भूत-भविष्य-वर्तमानाच्या गोष्टी माहीत होऊन जाने. यालाच दिव्य दृष्टी साक्षात्कार म्हणतात. नाही माझाकडे दिव्य दृष्टी नाही.

प्रश्न १०. संमोहन क्षेत्रात आपले काय काय उद्देश्य आहेत. तसेच आपण कोण कोणती समाज सेवा करू इच्छिता.

उत्तर:- संमोहनाद्वारे समाजजागृती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण केल्या जाऊ शकते. अंधश्रध्दा निर्मूलन , मनोरुग्णांना दुरुस्त करणे वैज्ञानिक दृष्टीकोन, मनातील भीती घालवणे ई. समाजसेवेची कामे मी करीत असतो आणि करू सुद्धा इच्छितो.

प्रश्न ११. काय शाळा कॉलेज मध्ये संमोहन शास्त्राचा विषय शिकवला जाऊ शकतो काय? त्यासाठी आपले कोणकोणते प्रयत्न चालू आहेत?

उत्तर:-. शाळा महाविद्यालयांत सुद्धा संमोहन विषय शिकवल्या जाऊ शकते. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेणे, समाजजागृती करून वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करणे, ई प्रयत्न माझे चालू आहेत.

प्रश्न १२. आजपर्यंत आपण किती विद्यार्थी विद्यार्थिनींना संमोहन विद्येचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांचे करीयर बनले काय. व ते सध्या काय करीत आहेत.

उत्तर:- आतापर्यंत जवळपास दोन हजार संमोहन स्टेज शो घेण्यात आले. संमोहनाच्या प्रशिक्षणातून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील विकास साधल्या गेले आहे. जवळपास १०० ते १५० विद्यार्थी संमोहन उपचाराचे प्रशिक्षण घेऊन दैनंदिन उपचार करतात. व त्यापैकी ५० विद्यार्थ्यांचे संमोहन क्षेत्रात करीयर घडले आहे. ते आता सन्मानाचे जीवन जगत आहे.

प्रश्न १३. संमोहन कला गुरुविना सेल्फ स्टडी करून शिकता येऊ शकते काय? कशी?

उत्तर:- होय, पुस्तक वाचून सुद्धा संमोहन शिकून जीवन सफल केल्या जाऊ शकते.

प्रश्न १४. प्राचीन काळातील संमोहन कलेचा इतिहास काय होता. या कलेचा शोध कुणी केव्हा लावला.

उत्तर:- संमोहनाचा शोध एंटर मेजमर यांनी मेजमिर्जन म्हणून शोध लावला व त्यानंतर डॉ ब्रँड यांनी हिप्नोटिझम या नावांनी शोध लावून. त्याचा उपयोग केला.

१५. आपण वाचकांस काय संदेश देऊ इच्छिता.

उत्तर:- प्रत्येक वाचकांनी आपल्या जीवनात यशस्वी व आनंदी जीवन घालवण्यासाठी संमोहनाचा उपयोग केल्या जाऊ शकतात. शंका समाधानासाठी या नंबर वर संपर्क साधावा :- 094031 16677
डॉ. जगदीश राठोड
पी.एच.डी.
संमोहनशास्त्र

धन्यवाद.

मुलाखत घेते:- अमर वासनिक                               न्यूज एडिटर
                  पोलिस योद्धा                                    न्युज नेटवर्क
                9309488024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *