धार्मिक अंधविश्वास प्रगतीस घातक धार्मिक अंधविश्वास बहुतांश सर्वच धर्मात आहे

धार्मिक अंधविश्वास प्रगतीस घातक
धार्मिक अंधविश्वास बहुतांश सर्वच धर्मात आहे व तो नव्या रुपाने फार मोट्या प्रमाणात वाढतंच आहे.फक्त प्रतिमाणे बदलून पूजा अर्चा केल्याने मानवी कल्याण होते नसते तरीही भारतात नवं नवीन धर्म स्थापन करून काही राजकीय धुरंधर मागासवर्गीय जनतेला एकसंघ होण्यापासून रोखण्यात यशस्वी झालेत..नवीन धर्म स्थापून मानवकल्याण होत नसेल तर धार्मिक बदलाची आवश्यकता काय! खरे तर *भारतीय संविधान आर्टिकल २५ नुसार स्पष्टीकरण दोन खंड(२) च्या उपखंड (ख) मध्ये हिंदू या शब्दोल्लेखात शीख ,जैन वा बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख समाविष्ट आहे,असा त्याचा अन्वयार्थ लावला जाईल आणि हिंदू धार्मिक संस्थाच्या उल्लेखांचा अन्वयार्थही तदनुसार लावला जाईल अर्थात हिंदू मॅरिज ऍक्ट नुसारसुध्दा शीख,जैन व बौध्द धर्म ग्रहण करणारे व हिंदु मधील आर्य,सत्यशोधक,
ब्राम्हो इत्यादी समाज मानणारे हिंदूच आहेत. तसेच वरील स्पष्ट उल्लेख भारतीय संविधानात आहे तेंव्हा सर्वप्रथम संविधानातच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे अन्यथा धर्मांतर करूनही आपली ओळख तीच राहील, यावर अग्रक्रमाने विचार व्हायला हवे. फार वर्षांपूर्वी अनेक लोकांनी अनेक धर्म बदल केलेत परन्तु त्यांच्या कृतीतून अंधश्रद्धा कमी झाल्या नाहीत तर उलट धार्मिक अंधश्रद्धा अधुनिक रूपाने वाढताना दिसत आहे. नागपूर /चंद्रपूर मुक्कामी जगविख्यात विद्वान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे दि.१४ / १६ ऑक्टोबर १९५६ ला लाखो अनुयायांनी *बुद्ध धम्म* स्वीकारला परंतु इतके वर्षानंतरही त्यांच्यधील अंधश्रद्धा गेल्या नाहीत.बुद्ध धम्म जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करण्याचा सिद्धांत स्वीकारतो परन्तु आजही धर्मातरित बौद्ध फक्त जाती-जाती मध्येच रोटी बेटी व्यवहार करीत आहेत त्यामुळे जातीयता नव्या रूपाने जोपासणा होत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला *नवयान* दिले परंतु नव धर्मांतरीत हीनयान वा महायान वाढवून भिक्कुचे स्तोम माजवून धार्मिक अंधश्रद्धाच वाढ करीत आहेत. सत्यनारायनाऐवजी परित्रानपाठ,लाल धाग्याऐवजी पांढरा धागा हा बद्दल मात्र दिसतोय.बुद्ध तत्वज्ञान मानवी कल्याण स्वीकारते परंतु बहुतांशी ते बाजुला सारून केवळ विधी जप करताना दिसतेय.जर पायाभूत बुद्ध धम्म तत्वज्ञान आचरण करून स्वीकारले असते तर पहिल्यांदा धम्म स्वीकारणारा समाज आज आर्थिक दृष्टीने लाचार व केवळ उत्सवप्रिय झाला नसता.धम्म सर्व क्षेत्रात प्रगतीस सहाय्यभूत होतो मात्र असे होऊ शकले नाही ह्याला कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले *नवयान* अर्थात *बुद्धा अँड हिज धम्मा* यावर पाहिजे तेवढा अमल कधीच केला गेला नाही तर श्रीलंकेचा,जपानचा, थायलंडचा बुद्ध वा हीनयान/महायान भोळ्या जनतेला आजही सांगत सुटले आहेत व त्याचाच प्रचार प्रसार होताना दिसतेय तसेही आज अति धार्मिक उन्माद अंगीकार केल्यानें श्रीलंका पाकिस्तान वा भूतानची काय अवस्था आहे? ज्या धर्म ग्रंथाने मानवा मानवात भेद करून ज्यांना मंदिराबाहेर ठेवले ते धर्मग्रंथ ज्यांना बाहेर ठेवलं त्यांनाच मुळासकट नष्ट करू द्या.उत्तरप्रदेश,दिल्ली व बिहार येथील मागासवर्गीय जागे होत आहेत.माणसा माणसात भेद करणाऱ्या चौपाईवर बुद्धीवादी,राजकीय मंडळी व पत्रकार भाष्य करीत आहेत. आपणही चिंतन जरूर कराल ही अपेक्षा अर्थात अतिभावनिक होण्यापेक्षा बौद्धिक व विज्ञानवादी होण्यासाठी पात्र तज्ञमंडळी द्वारे जनतेला समुपदेशन करायला हवे.देवाच्या व आत्म्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारून विज्ञानवाद स्वीकारून व मानवतावाद कृतीत जोपासणाऱ्या व जातीविहिन समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कुठल्याही धार्मिक उपासनेची आवश्यकता नाही ..असे कृतीत वर्तन करणारा वास्तववादी बुद्धिस्टच असतो मग तो कुणीही असो.ज्ञान ग्रहण करून व शहणपणाच्या (Wisdom) च्या दिशेने वाटचाल करणारा व विद्वानांना शरण जाणारा व मानव कल्याणासाठी कृती करणारा वास्तववादी बुद्धिस्टच होय केवळ विशिष्ट कपडे घालून जप करणारा कृतिशून्य व स्वतःचे पोट भरण्यासाठी जगणारा हा केवळ मानव प्राणी होय..केवळ स्वतःची राजकीय वंशावळी संवर्धनासाठी वा पुढे नेण्यासाठी भाषणे देणाऱ्या लोकांच्या सभेत अति भावनिक बनून गर्दी करण्यापेक्षा स्वतःचे ज्ञान,कौशल्य,पद व धन स्वतःच्या व इतरांच्याही कल्याणासाठी कामी कसे लावता येईल त्यावर बौद्धिकतेने विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृती कराल ही नम्र सूचना…
जयभीम
प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर,मनोवैज्ञानिक तथा लेखक
(लेख योग्य वाटल्यास पुढे फॉरवर्ड कराल ही नम्र विनंती)