कोंढाळीत अरविंद इंडो पब्लिक स्कूल कडून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा राष्ट्र विकासाकरिता नव वैज्ञानिकांची गरज सरपंच-केशवराव धुर्वे
Summary
कोंढाळी-वार्ताहर जागतिक दर्जाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व विज्ञानात रुची वाढवण्यासाठी तसेच समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या […]

कोंढाळी-वार्ताहर
जागतिक दर्जाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व
विज्ञानात रुची वाढवण्यासाठी तसेच समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. विज्ञाना उपयोग देशाच्या व जगाचे विकासासाठीच झाला पाहिजे असे मत कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे यांनी येथील अरविंद इंडो पब्लिक हायस्कूलचे वतिने आयोजित 28फेब्रूवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे प्रसंगी आयोजित विज्ञान प्रदर्शनी चे प्रात्यक्षिकांची पाहणी केल्यानंतर उपस्थित नव वैज्ञानिक विद्यार्थी,पालक, शिक्षक यांच्या समक्ष मार्गदर्शन केले व या विज्ञान प्रदर्शनी दरम्यान विज्ञानाच्या विविध प्रयोग करून दाखविनारे नव वैज्ञानिक तसेच जग विख्यात भारतीय वैज्ञानिकांचे जीवन पट उलगडून सांगणारे बालकांच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी समाज सेवी दुर्गाप्रसाद पांडे यांनी या प्रसंगी अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जात आहे.यातून समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल असे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक भूषण अलोनी यांनी विज्ञान प्रदर्शनीतील बारकावे समजून घेतले व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक ब्रजेश तिवारी यांनी विज्ञाना मुळे विकासाबरोबरच संभाव्य नुकसानीची ही याप्रसंगी माहिती दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अरविंद इंडो हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञाना दिवसा संबंधित प्रर्यावरण,ग्लोबल वॉर्मिंग, स्वच्छता, मानव विकास, मानवी शरीर रचना, स्वच्छ पाणी, रेनहावेस्टिंग, प्लास्टिक वेस्ट मटेरियल पासून वीटा, या सारखे 25प्रयोगांचे प्रात्यक्षिके करून व समजावून सांगितले तसेच विज्ञान शिक्षिका नेहा ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान दिवसावर भाषण, निबंध, लेखन, विज्ञान प्रश्नोत्तरी, विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र आणि चर्चासत्राचे आयोजन देखील करन्यात आले होते .,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनाली मोरेलिया तर आभार सिमरन शेख यांनी मानले.