चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

महानिर्मितिच्या चंद्रपूर महा औष्णिक वीज केंद्रात चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांना “संशोधन सहाय्यक'” म्हणून काम करण्याकरिता झाली निवड

Summary

आजच्या स्पर्धात्मक जगात नवनवीन संशोधने आणि सुधारणा यांना नेहमीच चालना व वाव देण्याची आवश्यकता निर्माण होत असते वीज उत्पादनाच्या अतिशय गुंतागुंतीच्या व तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यावर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या 2920 सीएसटीपीएस केंद्राने नुकतेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पदवी […]

आजच्या स्पर्धात्मक जगात नवनवीन संशोधने आणि सुधारणा यांना नेहमीच चालना व वाव देण्याची आवश्यकता निर्माण होत असते वीज उत्पादनाच्या अतिशय गुंतागुंतीच्या व तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यावर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या 2920 सीएसटीपीएस केंद्राने नुकतेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे पदवी तर आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या एकूण सहा विद्यार्थ्यांना संशोधन सहाय्यक म्हणून करून घेण्याबाबत सामंजस्य करार स्वाक्षरी दिनांक 26 जुलै 2022 ला करण्यात आली, महानिर्मितीचे मुख्य संचालक तथा अध्यक्ष माननीय संजय खंदारे साहेब व संचालक पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब थिटे, संजय मारोड़कर ,डॉक्टर मानवेंद्र रामटेके तसेच कार्यकारी संचालक भीमाशंकर म्हणता यांच्या मार्गदर्शनात नागपूर पुणे औरंगाबाद मुंबई रायगड कराड अमरावती आणि जळगाव अशा विविध 09 अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालयात सुमारे 60 संशोधन सहाय्यक म्हणून घेण्याची संधी दिल्या जाईल त्याकरिता या अभियांत्रिकी महाविद्यालय सोबत सामान जास्त करार करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीस वाढ व्हावी व शिकताना अर्थार्जन होणे गरजेचे आहे असे महानिर्मिती कंपनीला अभिप्रेत आहे.
चंद्रपूर महा औष्णिक वीज केंद्रात ,महानिर्मितीचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता श्री पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता प्रशासन श्री सुहास जाधव ,कार्यकारी अभियंता श्री रामेश्वर सोनेकर, प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशिक्षण विभाग श्री राजकुमार गिमेकर उपस्थित होते, तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांचे प्राचार्य डॉ.एस जी आकोजवार प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी डॉ पी. एस. लोंढे, डॉ.अनंत देशपांडे, डॉ. राजेश राजूरकर डॉ. दिलीप वाघाडे, डॉ राजेश पेचे ,यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ( M O U) पार पडला.
औष्णिक वीज उत्पादनात अभियांत्रिकी शाखांचा महत्वपूर्ण वाटा असतो प्रामुख्याने इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिविल, उपकरणीकरण ,या शाखांचा जास्त वाटा असतो संशोधन सहाय्यकाला वीज उत्पादन क्षेत्रातील उत्तम तांत्रिक कौशल्य, कमीत कमी संयंत्र वापर, प्रभारी मनुष्यबळ वापर ,जल ,वाफ इंधन ,वीज बचत, गुणवत्तापूर्ण अंकेशन ,विश्लेषण समस्येचे मूळ कारण शोधणे, जुन्या संचांचे नूतनीकरण ,आधुनिकीकरण, राख आणि कोळसा याचे दर्जेदार व्यवस्थापन, पर्यावरण संतुलन, वातावरण बदल ,प्रदूषण नियंत्रण अपरंपारिक ऊर्जा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब ,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन विकासात्मक अभ्यास, आणि शिफारसी इत्यादीचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागणार आहे ,अत्याधुनिक तंत्रज्ञान युवा पिढी अग्रेसर असल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी महानिर्मिती कंपनीने दिली आहे. यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या संशोधन सहाय्यक यास एक वर्ष प्रतिमा 25 हजार रुपये विद्यावेतन. तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन महिने प्रतिमा 20 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे
सदर संशोधन सहाय्यक योजनेअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रत्येकी तीन पदवीधर आणि तीन पदवी शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचे मुलाखती घेऊन निवड समितीने निकषानुसार निवड केली आहे.यामध्ये पदवीधर शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून चैतन्य पोतुंनवार, वैष्णवी फुलझेले व इलेक्ट्रिकल विभागातून मोनाली नारायने तसेच पदवी शिक्षण घेणाऱ्या मेकॅनिकल विभागातून कृष्णा वंजारी इलेक्ट्रिकल विभागातून श्रुतीका ठाकरे उपकरणीकरण विभागातून दुर्गेश राठोड या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी यशस्वी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *