जगत जननी याडी माँ माय
▪प्रासंगिक▪
जगत जननी
याडी
माँ
माय
पोलीस योद्धा वृत्त सेवा
वर्धा :- आज जागतिक मातृदिन आईची महिमा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. ती जगतजननी आहे. साहित्यामध्ये तिला फार मोठे स्थान दिला गेला आहे.
सर्वांचीच काळजी वाहणारी अशी एकमेव महिला या जगात जर कोणी असेल तर ती म्हणजे आई आहे. तिला माता देवी अशा शब्दांनी संबोधल्या गेला आहे.
कळीत मिटलेलं फुल आणि पोटात जपलेलं मुलं उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळत कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा तो एक असा आरसा आहे. ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत.
मुलगा कितीही बदमाश असला , चोर असला , डाकू असला दारूबाज असला, व्यसनाधीन असणार तरी आईला तो मुलगा ,मुलगाच वाटतो , स्वागत असं काळीज जास्त तिकडे आहे ती एकमेव स्त्री म्हणजे आईच.
मुलाने कितीही गुन्हे केले अपराध केला , चुका केला, वाईट मार्गाने लागला तरी त्याला आपल्या पदरात, आपल्या कुशीत घेऊन माया देणारी ही आईच असते.
सिंधू संस्कृती मध्ये मातृसत्ताक पद्धती होती. कालांतराने ती पितृसत्ताक बनवण्यात आली . मातृसत्ताक पद्धती मध्ये सर्व व्यवहार आईकडेच असायचे ती सांभाळत होती, आणि अगदी चांगल्या प्रकारे सांभाळून कुटुंबाची योग्य काळजी घेऊन त्याला योग्य वळण देण्याची काळजीही ती करीत होती.
पितृसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषी अहंकार जागा झाला आणि सर्व सूत्र वडिलांच्या हातात आले आणि अहंकारामुळे माणूस मागेपुढे न पाहता अविचाराने तिच्यावर अन्याय करू लागला.
आज तिचे लाचारीचे जगणे आहे ते पितृसत्ताक पितृसत्ताक पद्धतीने दिलेली एक देणगी समजावी का?
▪ आजही ती दुर्दैवीच▪
ज्यामळा पासून माणूस निर्माण झाला . त्याला मंदिरात प्रवेश आहे. परंतु काही मंदिरामध्ये तिला आजही प्रवेश नाही.हे कसे?? याचे कोडे अजूनही मला उलगडलेले नाही . जगतजननीं म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाते त्या स्त्रीयांना प्रवेश नाही त्यांना दुरूनच दर्शन घ्यावे लागते त्यांना आत मध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यास सक्त मनाई केली जाते. ही मानवाने तिच्यावर केली
कुरघोडी तर नव्हे अशी सापत्न वागणूक कोण देऊ शकतो.मांनवा शिवाय आजही ती निमूटपणे सर्व सहन करीत आहे . तिच्यावरील होणारा हा अन्याय आहे कधी दूर होईल याची चिंता वाटते.
माणूस मोठमोठ्या गप्पा मारतो पण स्त्रीविषयी आजही त्याचे विचार संकुचित आहे . असे वाटत नाही का ????? आजही ती दासी आहे का . ????? चूल आणि मूल यांच्या फेऱ्यातून ती बाहेर पडली नाही का.???? ही तीची साडेसाती कधी सुटेल याचीच खंत वाटत आहे.ती
आजच्या या जागतिक मातृत्व दिनानिमित्त. भारतीय स्त्रीला जेव्हा खरोखरच स्वातंत्र्य मिळेल तेव्हाच जागतिक मातृत्व दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असे मला वाटते.
▪महेश देवशोध (राठोड)
वर्धा , जिल्हा प्रतिनिधी