हेडलाइन

पतसंस्थांना चांगले दिवस येण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणा शिवाय पर्याय नाही

Summary

पतसंस्थांना चांगले दिवस येण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणा शिवाय पर्याय नाही काकासाहेब कोयटे   पुढचा येणारा काळ पतसंस्थांसाठी खूप चांगला आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवायची असेल तर पुढच्या काळात पतसंस्था शिवाय पर्याय नाही आणि हे सांगण्यासाठी मी गडचिरोली येथे आलो […]

पतसंस्थांना चांगले दिवस येण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षणा शिवाय पर्याय नाही

काकासाहेब कोयटे

 

पुढचा येणारा काळ पतसंस्थांसाठी खूप चांगला आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवायची असेल तर पुढच्या काळात पतसंस्था शिवाय पर्याय नाही आणि हे सांगण्यासाठी मी गडचिरोली येथे आलो असल्याचे उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोली च्या वतीने शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल गोकुल नगर येथील सभागृहात आयोजित दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटनिय भाषणातून काढले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था तथा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली चे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, वैनगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार हरिराम वरखडे , जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका तथा गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिव सुलोचना वाघरे, उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली चे कार्यालयीन अधीक्षक बी एस बनसोड , जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप खेवले, उपाध्यक्ष एस. व्ही. दुमपट्टीवार, मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर मंचावर उपस्थित होते. यावेळी संघाच्या वतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

काकासाहेब कोयटे पुढे म्हणाले,कोविड च्या काळात सुद्धा पतसंस्थांच्या ठेवी वाढत होत्या, याचे कारण म्हणजे कोरोना काळात पतसंस्थांनी ग्राहकांना दिलेली सेवा, त्यामुळे पतसंस्था वरील सर्वसामान्यांचा विश्वास वाढला आहे. पतसंस्थांना चांगले दिवस येण्यासाठी भविष्यातील आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे.पुढील काळातील प्रशिक्षण व तंत्रज्ञानात होणारे बदल आपण जर स्वीकारले नाही तर पतसंस्था चळवळ नामशेष व्हायला वेळ लागणार नाही असा सूचक इशारा सुद्धा त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना दिला.

पुढचा काळ हा पेपरलेस बँकिंग, ब्रांच बँकिंग चा असून चेक व एटीएम प्रणाली कालबाह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी व्याजदर आणि चांगले ग्राहक मिळवण्यासाठी पतसंस्थांनी “क्यू आर कोड” ही नवीन बँकिंग प्रणालीचा स्वीकार करण्याचा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांनी सहकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून पतसंस्था समोरील आव्हाने व त्यावरील उपाय योजना समजावून घेऊन आपल्या पतसंस्था सुदृढ करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी संघाचे अध्यक्ष दिलीप खेवले, माजी आमदार हरिराम वरखडे यांनी सुद्धा उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर, संचालन गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक भूषण रोहणकर तर आभार संघाचे व्यवस्थापक भास्कर नागपुरे यांनी मानले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक प्रा. मधुकर कोटगले, दिलीप उरकुडे, किशोर मडावी, मुकुंद म्हशाखेत्री, भास्कर खोये, श्रीकृष्ण अर्जुनकर, मनोज बैरागी सह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *