साई मंदिर आडापुल येथे गरजु नागरिकांना कंबल वाटप
साई मंदिर आडापुल येथे गरजु नागरिकांना कंबल वाटप
युको सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांचे जनहितार्थ उपक्रम.
कन्हान : – शहर व परिसरात कडाक्याची थंडी पडत असुन असाहाय नागरिक कसे बसे तरी थंडीचे दिवस काढत असल्याचे पाहता युको सावजी भोजनालय व धाब्याचे संचालक आणि शहर विकास मंचचे सदस्य श्री किरण ठाकुर यांचे व्दारे २० गरजु नागरिकांना कंबल (ब्लैंकेट) वितरण करून मदतीची उब देत जन हितार्थ उपक्रम राबविण्यात आला.
देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने लाॅकडाऊन लावल्याने किती तरी नागरिकांचे जन जीवन अस्त व्यस्त झाले असुन कसे तरी जीवन जगत असताना सध्या थंडीच्या कडाक्याने कन्हान, कामठी शहरातील असाहाय लोक या कडाक्याच्या थंडीत उघडयावर व जागा मिळेल त्या ठिकाणी कसेतरी रात्र काढत असलेल्या नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थि ती पाहवत नसल्याने थंडीपासुन त्याचा बचाव करण्या साठी युको सावजी भोजनालय आणि धाबा गहुहिवरा रोड कन्हान चे संचालक व शहर विकास मंचचे सदस्य श्री किरण ठाकुर यांनी कन्हान शहर विकास मंच पदा धिका-यांनी कन्हान, कामठी शहरातील २० गरजु नाग रिकांना कंबल (ब्लैंकेट) वाटप करून मायेने मदतीची उब देण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, कोषाध्यक्ष महेश शेंडे, हर्ष पाटील, उमेश शेंडे, प्रमोद जुगेल, दिने श ठाकरे, मनोज कलचुरी, सचिन घोडमारे, जीवन ठवकर, नुवर देवांगन, विलास उके, मंगेश सील्लेवार, सनोज पनिकर, विलास घारपिंडे, राजु मस्के, पांडुरंग आंबुलकर सह मंच पदाधिकारी व नागरिक बहु संख्ये ने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
9579998535