ग्राहकांच्या हक्काचे सामान्य माणसाला जाणीव करून देणे हे समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य: एकनाथराव कनाके
Summary
ग्राहकांच्या हक्काचे सामान्य माणसाला जाणीव करून देणे हे समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य: एकनाथराव कनाके राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान (महाराष्ट्र प्रदेश) जिल्हा चंद्रपूर च्या वतीने बल्लारपूर तालुक्यात ग्राहकांचे हक्क, ग्राहक चळवळ या विषयांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित […]

ग्राहकांच्या हक्काचे सामान्य माणसाला जाणीव करून देणे हे समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य: एकनाथराव कनाके
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान (महाराष्ट्र प्रदेश) जिल्हा चंद्रपूर च्या वतीने बल्लारपूर तालुक्यात ग्राहकांचे हक्क, ग्राहक चळवळ या विषयांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने एकनाथराव कनाके (संघटक महाराष्ट्र प्रदेश) संगीता येरमे (सहसंघटक महाराष्ट्र प्रदेश) अशोक अंबागडे (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर) सौरभ मादासवार (अध्यक्ष मानवी कौशल्य आणि विकास संस्था) आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकनाथराव कनाके यांनी उपस्थितांना ग्राहक हिताबद्दल मार्गदर्शन केले तसेच संगीता येरमे यांनी ग्राहकांचे हक्क आणि त्यांचे अधिकार याविषयी माहिती दिली सोबतच पदनियुक्ती सत्र कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात श्री. रोषण जांबुवंतराव घायवान यांची तालुकाध्यक्ष (तालुका बल्लारपूर ) म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अंबागडे यांनी ग्राहकांच्या हक्काची / न्यायाची माहिती दिली तसेच ग्राहकांनी जागृत राहावे असे आवाहन केले.