शहरातील वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
Summary
शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही ठोस उपाय योजना अमलात आणण्यासाठी लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात येऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष परविन भामानी, […]
शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही ठोस उपाय योजना अमलात आणण्यासाठी लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात येऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली . यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष परविन भामानी, सचिव मंजुषा मोरे, झोन चेअरपर्सन शेषराव येलेकर, नादिर भामानी, इंजि.डॉ. सुरेश लडके, डॉ. मिलिंद नरोटे आदि लायन्स सदस्य उपस्थित होते.
शहरात वाढत्या अपघाताला कोण जबाबदार आहेत स्वतः नागरिक, प्रशासन की आणखी कोण ? यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करायला पाहिजे. शहरातील अपघातांचे वाढते प्रमाण या मागे काही बाबी कारणीभूत असल्याचे लायन्स क्लब गडचिरोली ला वाटते. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रशासनाने खालील उपाय योजना अमलात आणाव्यात यासाठी क्लब च्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली .
*उपाय योजना*
१) फोनवरून बोलत वाहन चालवणे, ट्रिपल सीट मोठा आवाज करत भरधाव बाईक पळविणे, ह्या गोष्टी अपघाताला आमंत्रण देणाऱ्या आहेत. हे टाळण्यासाठी कडक दंडाची उपाय योजना करण्यात यावी.
२) शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.
३) शहरातून जाणारी जड वाहने शहराबाहेरून जावी यासाठी लवकरात लवकर रिंगरोड तयार करण्यात यावा.
४)शहरात आवश्यक ठिकाणी शासकीय जागांना पार्किंग म्हणून मान्यता देण्यात यावी. पार्किंग चा वापर करणार्यास पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. एखादा नागरिक पार्किंगचा वापर न करता रस्त्यावर, इतर कुठेही वाहन उभे करीत असेल तर अशा वाहनांना जामर लावावीत आणि कडक दंड आकारण्यात यावा.
५) महामार्गावरील पादचारी मार्ग नेहमी मोकळा राहील याची दक्षता घेण्यात यावी.
६) महामार्गावरील विभाजकांची लांबी जास्त असल्यामुळे फेरा चुकवण्यासाठी नागरिक चुकीच्या मार्गाने वाहने चालवितात, नागरिक चुकीच्या मार्गाने वाहने चालवणार नाही यासाठी उपाययोजना करावी.
७) रिंगरोड तयार होईपर्यंत शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपाचे स्पीडब्रेकर देण्यात यावे.
८) शहरातील अंतर्गत रस्त्यावर (महामार्ग सोडून) कायम स्वरूपाचे स्पीडब्रेकर देण्यात यावे.
९) शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील चारही रोड बाउंड्रीज तसेच डीव्हायडर व स्पीड ब्रेकर यांना रेडियम पेन्ट करण्यात यावे.
१०)मोटर वाहन अधिनियमानुसार अल्पवयीन मुले /व्यक्ती वाहन चालविणार नाही यासाठी कडक उपाय योजना करण्यात यावी.
११) रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या वस्तू विक्रेत्या मुळे बऱ्याच वेळा रस्त्यावर गर्दी निर्माण होते. वस्तू विक्रेते रस्त्यावर बसणार नाही यासाठी त्यांना सक्त ताकीद देण्यात यावी, त्यामुळे रस्त्यावरील गर्दी टळेल व संभावित अपघात होणार नाही.
१२) रस्त्याचे काम पूर्ण झाले असतानासुद्धा रस्त्यावरील बांधकाम साहित्य दिवसेंदिवस तिथेच पडून राहतात, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात होतात. ते होऊ नये म्हणून असे साहित्य लगेच उचलण्याचे कंत्राटदारांना निर्देश देण्यात यावे.
१३) शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम लवकरात लवकर, वेळेच्या आत पूर्ण करण्याची कंत्राटदारांना सक्त ताकीद देण्यात यावी.
वरील सर्व मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
शेषराव येलेकर
विदर्भ चीप ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क