BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून कामगारांचे आंदोलन कंपनीने दोनी मेन गेट बंद केल्या ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प

Summary

गडचांदूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर येथील प्लांटमध्ये ए.जे. इलेक्ट्रिकल्स मध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करणारे ईश्वर शिलारकर रा. आवारपूर बारा दिवसापूर्वी आपल्या कामावर काम करीत असतांना खाली पडल्यामुळे अपघाग्रस्त झाले होते. त्या अवस्थेत त्यांना चंद्रपूर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची […]

गडचांदूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर येथील प्लांटमध्ये ए.जे. इलेक्ट्रिकल्स मध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करणारे ईश्वर शिलारकर रा. आवारपूर बारा दिवसापूर्वी आपल्या कामावर काम करीत असतांना खाली पडल्यामुळे अपघाग्रस्त झाले होते. त्या अवस्थेत त्यांना चंद्रपूर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची गंभीर अवस्था बघता तेथून त्याला नागपूर ला रेफर करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांचा उपचारांवर झालेले पूर्ण खर्च व मृतकच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी आणि मृतकाच्या परिवारातील एक सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी ही मागणी घेऊन मोठ्या संख्येत येथील कामगार ईश्वर शिलारकर यांचे पार्थिव देह आज सकाळी १० च्या दरम्यान अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट वर आणून ठेवले. आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून मृत्यू देह हलवणार नाही अशी भूमिका कामगार वर्गाने घेतली आहे. कंपनीने आपले मेन गेट बंद केले आहे. कंपनी व्यवस्थापन समोर तणावाची स्थिठी निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन ने स्थिती चे गांभीर्य बघता कडक पोलिस बंदोबस्त लावला असून कंपनी व्यवस्थापन काय निर्णय घेते यावर सगळ्यांची नजर आहे. बातमी लीहेपर्यंत कामगार संघटनेनेचे नेते आणि कंपनी व्यवस्थापन मध्ये बोलणी सुरू झाली असे वृत्त मिळाले आहे पण अजून पर्यंत मृतदेह मेनगेटवरच असल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *