BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

Whatsapp जबराट फीचर, एक अकाऊंट चार फोनवर वापरता येणार

Summary

Whatsapp सातत्याने त्याच्या रंगरुपात आणि सेवेत बदल करत असते. नवनवीन फिचर्सचा समावेश करत चॅटींग अधिक सोईचं आणि सोपं व्हावं यासाठी व्हॉटसअपचा प्रयत्न असतो. व्हॉटसअपने एक नवीन फिचर आणायचं ठरवलं आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला एकच अकाऊंट चार वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येईल. WABetaInfo […]

Whatsapp सातत्याने त्याच्या रंगरुपात आणि सेवेत बदल करत असते. नवनवीन फिचर्सचा समावेश करत चॅटींग अधिक सोईचं आणि सोपं व्हावं यासाठी व्हॉटसअपचा प्रयत्न असतो. व्हॉटसअपने एक नवीन फिचर आणायचं ठरवलं आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला एकच अकाऊंट चार वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येईल. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे.
लॉगइन, लॉगआऊटची झंझट संपणार

Multi Device Support असं या फीचरला आपण म्हणू शकतो. आतापर्यंत एकाच फोनमध्ये व्हॉटसअपचं खातं सुरू करता येऊ शकत होतं. दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हॉटसअसप लॉगिन केल्यास पहिल्या मोबाईलमधून खातेधारक आपोआप लॉगआऊट होत होता. व्हॉटसअपचं नवं फीचर लागू झाल्यानंतर ही समस्या दूर होणार आहे. नव्या फीचरमुळे दरवेळी लॉग-इन, लॉगआऊट करण्याची झंझट संपणार आहे.

*असं काम करेल नवं फीचर*
WhatsApp च्या Multi Device Support मुळे मूळ मोबाईलमधील व्हॉटसअप लॉगआऊट न करता चार वेगवेगळ्या मोबाईलवर एकाचवेळी वापरता येऊ शकेल. मूळ मोबाईलशिवाय अन्य मोबाईलवर जर लॉगइन करायचं असेल तर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी मिळेल जो व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही 4 मोबाईलवर तुमचं व्हॉटसअप वापरू शकाल.

*Disappearing Mode आणि View Once फीचर*
वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉटसअपचं एकच खातं लॉग इन करण्याच्या सुविधेनंतर व्हॉटसअप आपोआप गायब होणारे मेसे आणि एकदाच पाहाता येणारे मेसेजचं फीचर आणण्याची शक्यता आहे. व्हॉटसअपने ठराविक काळानंतर आपोआप गायब होणाऱ्या मेसेजची सुविधा दिली होती त्यापाठोपाठ आता व्ह्यू वन्स नावाची सुविधाही मिळणार आहे. यामध्ये वापरकर्त्याला आपोआप फोटो आणि व्हिडीओ पाहाता येतील मात्र ते डाऊनलोड करता येणार नाहीत. व्हिडीओ आणि फोटो हे आपोआप गायब होणाऱ्या मेसेजप्रमाणे आपोआप गायब होतील.

Prashant jadhav Mumbai news reporter
Mobile number
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *