BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

▪वास्तुशास्त्र किती खरे किती किती खोटे ??▪ ▪पण समज , गैरसमज कितीतरी मोठे ??▪ ▪10 वी पास वास्तुशास्त्री हा खरंच वास्तुशास्त्री असतो . ??▪ ▪अंधश्रद्धे मध्ये अधिक एक भर म्हणजे वास्तुशास्त्र ??▪ ▪एक मुलाखत सुप्रसिद्ध साहित्यिक, याडीकार पंजाब चव्हाण ,पुसद . यांच्याशी ▪ ▪मुलाखत कर्ता , महेश देवशोध (राठोड ) वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪

Summary

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪ दिशा कोणतीही वाईट नसते ,भूमाता दोषयुक्त असूच शकत नाही, वास्तुशास्त्रामूळे प्रभावित होणारा समाजातील विशिष्ट वर्ग ,आपल्या आरोग्याचा वास्तुशास्त्राशी तिळमात्र ही संबंध नाही,अंधश्रद्धा मध्ये अधिक एक भर म्हणजे वास्तुशास्त्र . गेल्या वीस वर्षांपासून वास्तुशास्त्राविषयी लोकांमध्ये फार […]

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪

दिशा कोणतीही वाईट नसते ,भूमाता दोषयुक्त असूच शकत नाही, वास्तुशास्त्रामूळे
प्रभावित होणारा समाजातील
विशिष्ट वर्ग ,आपल्या आरोग्याचा
वास्तुशास्त्राशी तिळमात्र ही संबंध
नाही,अंधश्रद्धा मध्ये अधिक एक
भर म्हणजे वास्तुशास्त्र .
गेल्या वीस वर्षांपासून वास्तुशास्त्राविषयी लोकांमध्ये फार जागृती वाढली आहे. वास्तुशास्त्राविषयी लोकांमध्ये अलग अलग मत प्रवाह आहे काही लोक याला प्राचीन शास्त्र
मानतात तर काही लोक याला
कोणताही आधार नसून अवैज्ञानिक आहे असे म्हणतात.
त्यामुळे वास्तुशास्त्र हे नेहमी वादात सापडले आहेत. माझ्या एका इंजिनिअर मित्राने नाव न
छापण्याच्या अटीवर असे सांगितले की जेव्हा घराचा संपूर्ण
नकाशा बनविला जातो तेव्हा त्याला सिव्हिल आणि आर्किटेक्ट
नियमानुसार तयार करण्यात येतो
परंतु मकान मालकाला 10 वी
पास तथाकथित वास्तुशास्त्री वास्तू बाबत सल्ला देतो तेव्हा मात्र रंगात भंग झाल्यासारखे वाटते. आर्किटेक्ट आणि वास्तुशास्त्र शास्त्राची जुळवणी
करणे म्हणजे विज्ञान आणि अंध-
श्रद्धा यांचा मेळ बसविणे होय .
♦️वास्तुपुरुषाची गोष्ट ♦️
वास्तुशास्त्राचा निर्माता वास्तुपुरुष
होय. देवता आणि असुर यांचे युद्ध झाले त्यामध्ये असुराकडून
अंधकासुर आणि देवता कडून
भगवान शिव होते युद्धामध्ये दोघांच्याही घामाचे काही थेंब
पृथ्वीवर पडले त्यामधून एक अत्यंत बलशाली विराट पुरुषाची निर्मिती झाली त्या पुरुषाने देवता आणि असुर हे दोघेही फार घाबरून गेले देवतांना वाटलेकी हे
असुराकडील पुरुष आहे आणि
असुरांना वाटले की हे देवतांकडील पुरुष आहे त्यामुळे
भ्रम निर्माण झाला व युद्ध थांबविण्यात आले. आणि देवता व असुरांनी त्या विराट पुरुषाला घेऊन ते ब्रम्हा जवळ गेले ब्रम्हां ने त्याला मानसपुत्र म्हणून घोषित केले. आणि त्याचे नाव वास्तुपुरुष
ठेवले. वास्तुपुरुष एका विशेष मुद्रे
मध्ये शयन कक्षात विश्रांतीला
आडवे पडले त्यामुळे त्यांच्या काही भागांवर देवता आणि काही
भागावर असुरांनी वास करणे सुरू केले. त्यानंतर ब्राह्मजींनी असा संदेश दिला की जो कोणी मनुष्य भवन, नगर ,तलाव ,मंदिर
इत्यादी कामाचे निर्माण करेल त्या
वेळी वास्तुपुरुष याला ध्यानात ठेवले नाही तर असुर त्याचे भक्षण
करतील आणि जे लोक वास्तुपुरुषाला ध्यानात घेऊन कार्य करतील त्याला देवता सहकार्य करील अशा प्रकारे वास्तू
पुरुषाची रचना झालेली आहे. ♦️वास्तुशास्त्र म्हणजे काय?♦️
वास्तू शब्दापासून वास्तूचे निर्माण झाले असावे असा समज लोकांमध्ये आहे वास्तुशास्त्राचे आधारावर आधारित काही प्राचीन ग्रंथ आहे परंतु खूप साऱ्या
प्राचीन ग्रंथामध्ये जमिनीच्या निवडी पासून घराचे निर्माण कसे
करावे . या बाबतीत बरेच संदर्भाच्या ग्रंथाचे शोध घेऊन
वास्तुशास्त्राची अनेक पुस्तके लिहिली गेली आहे हे सर्व पुस्तक समरांगण सूत्र, मनुस्मृती ,वास्तू
रत्नाकर, शिल्पशास्त्र ,राजवल्लभ
मंडलम , बृहद वास्तू माला वास्तू
सार संग्रह ,गृह वास्तू प्रदिप ,मत्स्यपुरण या पुस्तकांचे संदर्भ घेऊन लिहिलेले आहे.
♦️वास्तूशास्त्राचा उद्देश ♦️
वास्तुशास्त्री असे दावा करतात की जर मनुष्याने वास्तुशास्त्राच्या हिशेबाने भवन, दुकान, कारखाना, व मंदिरे बनवले तर
त्यांच्या घरात खुशाली, शांती आणि त्यांची भरभराट होते.
कोणत्याही प्रकारची जन धन
हानी होत नाही. हे खरे वास्तुशास्त्राचे उद्देश आहे ते असे
सांगतात की तमाम प्रकारच्या अडचणी , बिमारी ,कुटुंब कलह
हे वास्तुशास्त्रानुसार बनलेल्या
घरात राहत नाही. वास्तूचे मुख्य
स्तंभ पौराणिक शास्त्रानुसार
वास्तुशास्त्र तीन आधारावर अवलंबून आहे. जाती, दिशा ,
दिवस चला आपण हे तीन
आधार पाहूया .
♦️जाती ♦️
हे वास्तुशास्त्राचे सर्वात प्रमुख
आधार आहेत. जातीच्या आधारावर वास्तूची सल्ला देण्यात
येते . जरी जमीन निवडीचे असो
की निर्माण समुग्रीचे नेहमीच जाती आधारावर अलग अलग
जाती प्रमाणे सल्ला दिला जातो.
यामध्ये लांबी – रुंदी ही जाती
निहाय वेगवेगळी सांगितली जाते.
जसे ब्राह्मण लोकांच्या घरासाठी
10 अंश अधिक क्षत्रिय लोकांकरिता लांबी रुंदी पेक्षा 8 अंश अधिक वैशा साठी 6 अंश तर शूद्रा साठी 4 अंश अधिक
सांगितल्या जाते . जाती नुसार
घराची सीमा वास्तुशास्त्र ठरवते .
जसे शूद्रा करिता साडेतीन तळाचे
घर कल्याणकारी राहते . या पेक्षा जास्त जर असेल तर त्याच्या कुळाचा नाश होतो.
♦️दिशा ♦️
वास्तुशास्त्राचा दुसरा नियम आहे
दिशा हे एक प्रमुख आधार असून
उत्तर आणि पूर्व दिशेचे घर शुभ
मानतात तर दक्षिण मुखी घर अशुभ मानले जाते . परंतु विश्व
कर्मा वास्तुशास्त्रात 16 दिशांचे
वर्णन असून 8 दिशा या प्रकारच्या
आहेत. उत्तर , दक्षिण , पूर्व ,
पश्चिम , इशान्य , आग्नेय , नैऋत्य
,वायव्य जाती नुसार कोणत्या
माणसाला कोणती दिशा चे फळ
मिळतील हे पाहिले जाते.
♦️ दिवस ♦️
दिवस आणि तिथीला वास्तुशा –
स्त्रा मध्ये फार मोठे महत्त्व आहे.
हे एक आधाराच्या रुपात काम करीत असते या अंतर्गत पौर्णिमा
अमावस्या वार चा विचार केला जातो. खास करून गृहप्रवेशाच्या
वेळी तिथी आणि दिवस महत्वाचा मानला जातो . गृह
वास्तुशास्त्रातील ग्रंथ मत्स्यपुरानात मास पक्ष आणि वार याला गृहनिर्माणांमध्ये शुभ
तर काही ठिकाणी अशुभ सांगी –
तलेले आहे . ज्यादातर वास्तुशा
स्त्री किंवा आर्किटेक असलेले
वास्तुशास्त्री सुध्दा सांगतात की
वास्तुशास्त्र हे विज्ञानाच्या रुपात आहे परंतु त्यांना विसर पडतो की
विज्ञानाचा एक नियम असतो
विज्ञानाच्या कसोटीवर उतरण्यासाठी त्याचे परीक्षण,
प्रयोग , प्रवृत्ती अनुमान आणि
डाटा संग्रहन करावे लागते जर
नेहमी एकच परीक्षण येत असेल
तर विज्ञान नाहीतर अंधविश्वास
असल्याचे सिद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार कोणतेही घराचे
प्रवेशद्वार दक्षिणेकडे असायला नको कारण ते अशुभ मानल्या जाते . परंतू कोणत्याही मोठ्या
गावात किंवा शहरात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी शेकडो वर्षांपासून दक्षिणमुखी
असलेली घरे असून त्यांचे कोणतेही नुकसान झाल्या बाबत
ऐकिवात नाही . त्याच प्रकारे दुकाने सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघडी असतात एकीकडे
उत्तर दिशा तर दुसरीकडे दक्षिण
दिशा परंतु त्याचाही धंदा चांगला तेजीत असतो .
♦️दारूचे दुकान ♦️
दारूचे दुकान कोणत्याही दिशेला
राहू द्या किंवा गल्ली बोळात राहू
द्या . तेथे तुफान गर्दी राहत असुन
दुकान फारच भरभराटीत राहते
येथे मात्र वास्तुशास्त्राचे नियम फिट बसत नाही. त्यामुळे येथे
वास्तुशास्त्र टाय — टाय फीस
होऊन जाते. दारुच्या दुकानाला
वास्तुशास्त्राचे नियम का लागू होत नाही. हे मात्र कोडेच आहे .
पण वास्तुशास्त्रीला जर ही गोष्ट
सांगीतली तर तर ते काही हालगु
मालगु समर्थन करतील.

▪उरलेला भाग पुढील लेखात

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
▪महेश देवशोध (राठोड )▪
▪वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪ 73 78 70 34 72▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *