महाराष्ट्र हेडलाइन

▪प्रहार ——-2 ▪ ▪प्रकाश पोहरे▪ ▪आपण सत्याग्रही आहोत▪ ▪हत्यारे नाही ▪ ▪लहान मोठे सर्व मतभेद विसरून एकत्र येणे आणि लढा देने अत्यंत आवश्यक आहे▪ ▪हा निकराचा लढा आहे ▪

Summary

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪ जनतेने या वेळी जागे होऊन , प्रत्यक्ष ,सनदशीर आणि शांततेने चालवलेला लढा या राजवटी विरोधात उभा केला पाहिजे. आपण सत्याग्रही आहोत——– हत्यारे नाही, आम्हाला या देशात जे परिवर्तन घडवून आणायचे आहे. हे शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने […]

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪

जनतेने या वेळी जागे होऊन , प्रत्यक्ष ,सनदशीर आणि शांततेने
चालवलेला लढा या राजवटी विरोधात उभा केला पाहिजे.
आपण सत्याग्रही आहोत——–
हत्यारे नाही, आम्हाला या देशात जे परिवर्तन घडवून आणायचे आहे. हे शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आणायचे आहे.
याला फार मोठी अडसर ही राजवट आहे…. त्यांचा तथाकथित राजकीय पक्ष आणि त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. ही दोन नाहीत ही एक च आहेत हे आजपर्यंत झालेल्या घटनांतून सर्वांच्या लक्षात आलेले आहे. तेंव्हा जनतेने आपला लढा ,
आपल्या मार्गाने , म्हणजे
शांततेच्या मार्गाने उभारण्याकरिता पुढे आले पाहिजे.
१९३० साली शहीद भगतसिंग एक पत्र लिहतात आणि राष्ट्राला एक संदेश देतात , की ‘अगर कोई सरकार जनताको
उसके मूलभूत अधिकारोसे वंचित
रखती है ,तो जनता का केवलं यह अधिकार ही नहीं, बल्की आवश्यक कर्त्यव्य बन जाता है,की ऐसी सरकारको त बा ह
कर दे ‘———मला वाटते भगत
सिंगाचा तो संदेश कृतीत उतरवण्याची आता वेळ आली आहे.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. देशाची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे.
अठरापगड जाती , धर्म, पंथ आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्न आहेत . त्यामुळे
विरोधाचा सूर उठणारच . हुकूमशाही, लष्कशाही असलेल्या देशातही जनता रस्त्यावर येते. रशियात पुतीन यांची ऐका धिकारशाही आहे. त्यांच्या हुकूमशाहीस न जुमानता लाखो लोक त्यांच्या विरोधात मास्को, क्रेमलिन परिसरात रस्त्यावर उतरले आहेत. बाजूच्या म्यानमार
मध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारला दूर करून तेथे लष्कराने सत्ता ताब्यात घेतली, पण बंदुकांची ,रणगाड्या ची पर्वा न करता त्या देशात जनतेने आंदोलन सुरू केले
आहे.
भारतात सुध्दा जनतेने हे समजून घ्यायला हवे, की व्यक्ती
ला आंदोलन करण्याचा व असहमती व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.
दिल्ली च्या सीमेवर
शेतकरी अनेक महिन्यांपासून
रस्त्यावर आंदोलन करीत आहेत.
सरकारने जे तीन कृषी कानून (कायदे ) आणले आहेत त्यामुळे देशाचा कणा मोडला जातोय . शेतकऱ्यास परावलंबी व्हावे
लागेल व भविष्यात त्याला चार
पाच बड्या उद्योगपतीचे गुलाम
च व्हावे लागेल. पेट्रोल, डिजलचे
भाव रोज वाढत आहेत . पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल असे
भय आहे . आंतरराष्ट्रीय बाजारात
‘क्रूड आइल ‘ च्या किंमती कमालीच्या घसरूनही मोदींचे
सरकार देशातील जनतेला त्याचा लाभ द्यायला तयार नाही.
लोकांच्या चुली विझवून सरकार स्वतः ची तिजोरी भरत आहे . बेरोजगारांच्या मनात
असंतोष खदखदत आहे. सरकारे
मूकबधिर झाल्याने आता लोकांना रस्त्यावर उतरून ठाण मांडा वे लागणार आहे. जि एस टी तील जाचक तरतुदींमूळे व्यापारी हैराण झालेले आहेत.
विमानतळे, विमाणकंपण्या ,
सार्वजनिक उपक्रमांची बिनधास्त विक्री सरकारने चालविली आहे.
देशातील प्रमुख बंदराचे खाजगीकरण सुरू असल्याने
नोकऱ्या जात आहे. न्यायालयात
न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रंजन गोगाई
एकूण काय तर न्याय
व्यवस्था, प्रसार माध्यमे व नोकरशहा एकीकडे आणि संसद दुसरीकडे आशा संघर्षातून लोकशाही बळकट होत राहते , कारण का हा संघर्ष लोकहितासाठी असतो, पण नोकरशाही न्यायव्यवस्था सरकारच्याच हातात आहे.
आम्ही आधुनिक काळात वावरणारे आहोत की प्राचीन युगात जाणार आहोत ?????
संघर्षाशिवाय पर्याय नाही, ही
खुणगाठ बांधून ठेवावी लागेल.

▪पोलीस योद्धा वृत्त सेवा▪
▪महेश देवशोध (राठोड)▪
▪वर्धा, जिल्हा प्रतिनिधी▪
▪7378703472▪

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *