BREAKING NEWS:
हेडलाइन

हरवले ते गवसले का ?

Summary

हरवले ते गवसले का ? ▪आज आंतरराष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस   ० पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी जवळची एखादी वस्तू जेव्हा हरवते तेव्हा आपण अस्वस्थ होतो. ती वस्तू मिळत नाही तोवर मनाला शांतता मिळत नाही. मग […]

हरवले ते गवसले का ?

▪आज आंतरराष्ट्रीय बेपत्ता मुलांचा दिवस

 

० पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ०

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी

जवळची एखादी वस्तू जेव्हा हरवते तेव्हा आपण अस्वस्थ होतो. ती वस्तू मिळत नाही तोवर मनाला शांतता मिळत नाही. मग ज्यांची पोटची मुले हरवतात त्यांचे दुःख तर कल्पनेपलीकडे असेल मुलेही काही वस्तू नाही ती तर आई-वडील आणि कुटुंबीयांची जीवनच असतात . त्यांच्याशी असंख्य आशा-आकांक्षा जोडलेल्या असतात . ही मुले कधीतरी अपघाताने हरवतात आणि घरच्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होते .

आजही देशात आणि जगात अशा हरवलेल्या यांची आणि न सापडलेल्या मुला-मुलींची संख्या बरीच मोठी आहे. अशाच बेपत्ता मुलांचा दिवस म्हणून 25 मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. हा दिवस बेपत्ता मुलांसाठी मानला जातो. गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या या बेपत्ता बालकांची आठवण हा या दिवसांचा मुख्य उद्देश आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1983 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती . 2001 मध्ये याला औपचारिक मान्यता प्राप्त झाली .

बेपत्ता झालेल्या बहुतांश मुले ही मानवी तस्करीच्या विळख्यात सापडतात . असे निरीक्षण आहे .

देशातील आकडेवारी पाहिली तर 2021 मध्ये मध्यप्रदेशात दररोज सरासरी 29 आणि राजस्थानात 14 मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . ‘ स्टेटस चाइल्ड राईट्स स्टेटस रिपोर्ट ऑन मिसिंग चिल्ड्रन ‘ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे . अहवालानुसार उत्तर भारतातील चार प्रमुख राज्यांमध्ये मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे .

2021 मध्ये दिल्लीतील आठ जिल्ह्यांमध्ये दररोज पाच मुले बेपत्ता झाली आहेत . उत्तर प्रदेशातील 58 जिल्ह्यांमध्ये दररोज आठ मुले बेपत्ता होतात . 2021 मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानात हरवलेल्या मुलींची संख्या मुलांपेक्षा पाचपट जास्त आहे . मध्य प्रदेशातही इंदोर , भोपाळ , जबलपूर आणि रीवा याठिकाणी बेपत्ता होण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे .

काळ हे सर्व प्रकारच्या वेदनांवर वर औषध असते . असे म्हटले जाते . मात्र काही वेदनां अशा असतात ज्यांना काळाची फुंकरही शांत करू शकत नाही . आपले अपत्य हरवण्याची आणि ते न मिळण्याची वेदना ही त्यापैकीच एक आहे . मृत्यू झाल्याबाबत ते परत जाणार नाहीत . हे वास्तव स्वीकारले जातील . मात्र हरवलेली जवळची व्यक्ती त्यातही आपले अपत्य असेल तर ते कधीतरी सापडेल ही वेडी आशा जगूही देत नाही . आणि मरणही जवळ करू देत नाही . या सर्व स्थितीत केवळ आशा ठेवणे आणि शोधण्याचे प्रयत्न कायम राखणे या दोन्ही गोष्टी कुटुंबियांच्या हाती उरसात आजही जगभरातील अनेक कुटुंबीय याच आशेच्या आधारे जीवन कंठत आहे .

 

पोलिसी योद्धा न्यूज नेटवर्क

महेश देवशोध ( राठोड )

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *