सायबर गुन्हेगारी व त्याचे प्रकार सायबर गुन्हे रोखण्यासाठी सतर्कता हाच उपाय स्नेहल ढोबळे
Summary
कोंढाळी-वार्ताहर- दुर्गाप्रसाद पांडे दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच […]
कोंढाळी-वार्ताहर-
दुर्गाप्रसाद पांडे
दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावर उपाय आहे, अशी माहिती नागपुर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल च्या तंत्रज्ञानतज्ज्ञ स्नेहल ढोबळे यांनी१४जून रोजी कोंढाळी पोलीस स्टेशन माध्यमातून कोंढाळी येथील बाजार चौकात सायबर व त्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी उपाय या बाबतीत माहिती देण्यात आली. या प्रसंगी सायबर चोरी, ई-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, व्हायरस हल्ला, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत. त्याचबरोबर पोर्नोग्राफी, ट्रॅफिकिंग यासारखे काही गुन्हे हे संपूर्ण समाजाच्याच आरोग्यास हानी पोहोचवत असतात. भारतात या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे सांगून त्यांनी या सर्व प्रकारांविषयी माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले, असे असूनही आपल्याकडील लोक सायबर सुरक्षेविषयी फारसे जागरूक नाहीत. केवळ इंटरनेट असेल तरच गुन्हा घडतो, हा समजदेखील चुकीचाच आहे. सध्या फेसबुकवर देवनागरी लिपीतील शब्दांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मराठी भाषेवरील आपले प्रेम, आदर या माध्यमातून व्यक्त करताना आपण एकप्रकारे गुन्हेगारांनाच मदत करत आहोत, याचा मात्र आपण विचारही करत नाही. परदेशातील व्यक्तींना अजून मराठी भाषा फारशी अवगत नाही, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे मानले जाते. पण, यामुळे गुन्हेगारांकडे आपल्या भाषेचा शब्दसंग्रह तयार होईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोणत्याही वेबसाइटवर पासवर्ड मागितला की आपल्या दैनंदिन वापरातील शब्द पासवर्ड म्हणून हमखास वापरण्याकडे कल असतो. त्यामुळेच हॅकर सहवासात राहून आपल्या तोंडातूनच पासवर्ड वदवून घेतो व आपले अकाउंट हॅक करतो. त्यामुळे अतिशय दुर्मीळ शब्दांचा पासवर्ड म्हणून वापर करणे बेहत्तर.
– फेक ई-मेल ओळखणे सहज शक्य आहे. त्या ई-मेलमध्ये वापरलेली भाषा, त्यातील शब्द हे बहुतेकदा ते ई-मेल खोटे असल्याची पावती देत असतात. बरेचदा असे ई-मेल कॅपिटल लेटर्समध्ये टाईप केलेले असतात.
– नोकरी किंवा भली मोठी ऑर्डर देतो त्यासाठी अमुक एक रक्कम भरा, अशा कोणत्याही प्रकारचे कॅश ट्रॅन्झ्ॉक्शन ई-मेलद्वारे करणे शक्यतो टाळलेलेच बरे. लक्षात ठेवा एकदा तुमचा पैसा परदेशात गेला त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर पोलिसदेखील मदत करू शकत नाहीत. सायबर क्राइम पोलिसांचा सल्ला घेतलेला अधिक चांगले.
या प्रसंगी सायबर क्राईम चे प्रकार व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनां ची माहिती देन्या बाबद नागपूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्या अंतर्गत येणार्या गावातील नागरिकांपर्यंत पोहोचावा असे निर्देश नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ संजय पखाले, यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब रोहान कोंढाळी चे ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे यांच्या उपस्थितीत येथील बाजार चौकात शेकडो नागरिकांना सायबर क्राईम काय व त्यापासून बचावा बाबदची माहीत समजावून सांगण्यात आली.