सरस्वती विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
Summary
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम. बी.विद्यालय व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, […]

अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम. बी.विद्यालय व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,जी.एम. बी. प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, कल्पना भुते,प्रा.टोपेश बिसेन,प्रा. ओंकार लांजेवार, वरिष्ठ शिक्षक शिवचरण राघोरते, उपस्थित होते.सर्वप्रथम पहिले नोबल पारितोषिक विजेते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेचे निर्मूलन करून विज्ञानाची कास धरली पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी. पठान यांनी केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा विज्ञान दिवसाबाबत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.सत्र २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी गार्गी कुंभारे,तन्मय जांभुळकर तसेच जी.एम.बी.विद्यालयातून जिल्हास्तरावर सहभागी श्रद्धा गौतम या विद्यार्थ्यांनी त्यांनी प्रदर्शित केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर केले.तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेतर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार वर्ग नववीची विद्यार्थिनी संचिता शहारे आणि वेंजल डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले.