सरस्वती कनिष्ठ व विज्ञान कला महविद्यालयाचा निकाल १२वि बोर्ड परिक्षेत गोंदिया जिल्ह्यातून प्रथम
Summary
गणेश सोनपिंपळे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मो .येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय सन २०२४ नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व कला शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. यात विज्ञान व कला […]

गणेश सोनपिंपळे
प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मो .येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय सन २०२४ नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र
बोर्डाच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व कला शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. यात विज्ञान व कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.विज्ञान शाखेतून आदेश शरद देशमुख ९५.५०%(५७३) गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालाआहे .तसेच कु. लीना दुर्योधन मडावी ९३.६७% (५६२) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय व मुलींमधून प्रथम ठरली आहे. याच प्रमाणे कला शाखेतून कु. प्रेरणा अशोक दहिवले ९०% (५४०) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय आली आहे. आदेश देशमुख हा विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा शाळेतून प्रथम आला होता हे विशेष.
एच. एस. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी २०२४ करिता सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून एकूण १४८ विद्यार्थी उतीर्ण झाले होते. यापैकी ५६ ,विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, ८८,विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी शंभर टक्के आहे. तर कला शाखेतून एकूण ४४,विद्यार्थी उतीर्ण झाले होते. यापैकी १०,विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, २५,विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ९,विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेची सुद्धा निकालाची टक्केवारी शंभर टक्के आहे.
विज्ञान शाखेत सुशांत अशोक खरकाटे ९१.५०% (५४९), अनिकेत अनिल नंदेश्वर ९१.१७% (५४७), कु. अस्मिता राजेंद्र संग्रामे ९०.१७% (५४१), कु. अर्पिता रूपचंद नाकाडे ८९.५०% (५३७), हिमांशू उदाराम खरवडे ८९% (५३४), कल्पक कांतीलाल लाडे ८८.५०% (५३१), कु. ऋतुजा अनिल बहादुरे ८८.१७% (५२९) विद्यार्थी गुणांनुक्रमे आली आहेत. तसेच कला शाखेतून कु. गुंजन हेमंतकुमार कापगते ८६.१७% (५१७), मंदार संजय परशुरामकर ८६% (६१६) गुणानुक्रमे द्वितीय व तृतीय ठरले आहेत. तसेच कला शाखेतून कु. ज्ञानेश्वरी ताराचंद करपते ८१.६७% (४९०), कु. नेहा विनोद सोनवाणे ८१.५०% (४८९), कु. स्वेता राजेंद्र कानेकर ७९.६७% (४७८), कु. रिया कालिदास सयाम ७९.१७% (४७५) कु. सलोनी दीनदयाल डोंगरे ७६.५०% (४५९), साहील प्रमोद पाल ७५.१७% (४५१) गुण प्राप्त केले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा, संस्थासचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या, प्राचार्य जे. डी. पठाण, उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल व सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.