संत्रा उत्पादकांची वाढली चिंता अनिल देशमुख शेतकर्यांचे संत्राच्या बगिचात! ३२ हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ ३६कोटी नुकसान! ई पीक पाहणी प्रात्यक्षिकात सदोषपणा
काटोल/कोंढाळी -वार्ताहर
{सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे.}
यात संत्रा उत्पादकांची चिंता वाढली असुन , अंदाजे ३२ हजार हेक्टरमध्ये आंबियाची गळ झाल्याचे या भागातील -कृषी अधिकार्यांचे व शेतकर्यांनी सांगितले आहे.
मागील एक महिन्यापासून विदर्भात आंबिया संत्र्याची फळ गळ होत असल्याने संत्रा मोसंबी उत्पादकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर चे जिल्ह्याधिकाऱ्यांशी पंचनाम्याबाबत बोलणी केली आहे. मात्र कृषी, ग्राम विकास, व राजस्व विभागाकडून संयुक्त पाहणी वेळत होत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार अनिल देशमुख यांना सांगितले आहे.
सध्या वातावरणातील बदल बुरशीजन्य रोग, पोषक तत्त्वाची कमी, शेतातील पाण्याचा निचरा न होणे यासह अन्य कारणांमुळे संत्राच्या आंबिया बहराची गळ होत आहे. त्यामुळे पक्व होण्याच्या प्रक्रियेतील संत्र्याची गळ होऊन झाडाखाली फळांचा खच पडताना दिसतोय.
या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ०९सप्टेबर रोजी काटोल तालुक्यातील काही भागात पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. पंचनामे करण्याची सूचना यंत्रणेला दिल्याचे सांगितले.
अंदाजे ३२ हजार हेक्टरमध्ये संत्राची फळगळकृषी विभागाच्या नजरअंदाज माहितीनुसार जिल्ह्यात किमान ३२ हजार हेक्टरमध्ये संत्र्याच्या आंबियाची गळ झालेली आहे.यात ३५कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितलेल्या गेलेआले. राज्याचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना संत्रा उत्पादकांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
राजस्व विभाग निवडणुकी संबधी प्रशिक्षण प्रक्रियेत गुंतले आहे, त्यामुळे पंचनामे प्रभावीत होत आहे. या भागातील संत्रा उत्पादकांची नुकसा भरपाई करण्याची मागणी आमदार अनिल देशमुख व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रत्यक्ष संत्रा 🍊 बागेत जाऊन संत्रा पीक नुकसानी बाबद माहिती घेण्यासाठी
आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
.09सप्टेबर रोजी काटोल तालुक्यातील संत्रा व मोसंबी पिकाची फळगळची कचारीसावंगा, कलकुही येथील शेतकरी विश्वेश्वर टेंभे तसेच कचारीसावंगा येथील बंडु मेहर यांचे शेतावर प्रत्यक्ष जाऊन फळगळीची पाहणी केली.* *तसेच ढवळापुर, कुकडीपांजरा, पानवाडी येथील शेतावर भेट दिली, यावेळी भेटीदरम्यान नागपुर जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, रा.का.अध्यक्ष अनुप खराडे, चंद्रशेखर कोल्हे, डाॅ.अनिल ठाकरे, बाबा शेळके, उदय ठाकरे, सरपंच रवि जैस्वाल, राष्ट्रपाल पाटील, राजु टेंभे, भोयर, डाॅ.प्रदीप दवने, ना.त.संजय भुजाडे, ता.कृ.अ. विक्रम भवारी, तलाठी .प्रिती चव्हान , ग्रामसेवक प्रविण वंजारी, बंडुभाऊ राठोड, नितीन ठवळे, अरुण राऊत,अजय लाडसे, सुरेश पर्बंत, गणेश चन्ने, राजु उमप, श्रीकृष्ण डिवरे, संजय डफर, बंडु तभाने, ईस्माईल पठाण, पुष्पाकर पवार, माधवराव अनव्हावे, पानवाडीचे सरपंच प्रकाश कोठे, तथा अनेक शेतकरी व अधिकारी उपस्थित होते.* *यावेळी सरसकट 5 वर्षावरील संत्रा, मोसंबी झाडे असलेल्या शेतक-यांना फळगळची मदत मिळवुन देण्याबाबत शासनाकडे मागणी करणार, तसेच कलकुही येथील शेतकरी विश्वेश्वर टेंंभे यांचे शेत सर्व्हे क्र.58 मध्ये जाऊन प्रत्यक्ष ई – पिक पाहणी केली असता शेत 1400 मिटर अंतरावर दाखवीत असल्याचे निदर्शनास आले, यामुळे ई-पिक पाहणी ऐप सदोष असल्याचे निदर्शनास आले ,याबाबत सुध्दा शासनाकडे पत्र लिहुन सरसकट पिकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मागणी करणार असे अनिल देशमुख यांनी सांगीतले.