“संघ” आणि “कोसळती भारतीय अर्थव्यवस्था”
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 30 एप्रिल 2021
गोळवलकर यांचे We and Our Nationhood Define हे पुस्तक वाचले की, अर्थव्यवस्था मोडकळीस आणने हे आरएसएसचा मुख्य हेतू आहे असे गोलवलकर यांच्या पुस्तकात सविस्तरपणे सांगितले आहे. गोलवलकर लिहितात की सत्तेत राहण्यासाठी देशाचा ९५% भाग उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. गोलवलकर यांच्या नियमानुसार 95% देश गरीब झाला व काही सर्वशक्तिमान बनले तर सत्ता सदैव काबीज केली जाऊ शकते. नोटाबंदी, जीएसटी, बँकांचे एनपीए, पीएमसी, सरकारी उपक्रमांची विक्री, नौकर्या संपुष्टात आणणे, दंगली घडवून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणे, संविधान बदलून कमकुवत करणे, देशातून छोटे व्यवसाय हटविणे आणि बँकांचे बुडणे व नासाडी करणे. मोबाईल कंपन्यांसह अनेक कंपन्या बंद करण्यास भाग पाडणे हा सर्व त्या कटाचाच भाग आहेत. यूएनच्या अहवालानुसार 2016 ते 2018 पर्यंत १०९५ श्रीमंत भारतीय भारत सोडून दररोज परदेशात जात आहेत, व काही कोट्यवधी लोकांना परदेशात पाठवले जात आहे. सरकारच्या धोरणांमुळे बरेच उद्योगपती डिफॉल्ट झाले, तर काही उद्योजकांची संपत्ती शंभर पट वाढली . हे गुलाम उद्योगपती, अंबानी, अदानी, रामदेव आणि भाजपाचे अनेक खास लोक आहेत. ज्या उद्योगपतींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही त्यांना भारत सोडून जाणे भाग पडले त्यामुळे कोट्यवधी रुपये बुडविणेस त्यांना मदतच झाली.
देशाची अर्थव्यवस्था बुडत आहे आणि सरकारच्या तोंडावर सुरकुत्या नाहीत.या सर्व तथ्यावर विचार करणे आवश्यक आहे.
गोलवलकरांनी जे सांगितले की देश कमकुवत करा आणि उध्वस्त करा गोलवलकर’ या पुस्तकात We and Our Nationhood Defined मध्ये लिहितात – एका चांगल्या प्रशासनाने आपल्या राज्यातील लोकांचे उत्पन्न किमान ठेवले पाहिजे याची खात्री करुन घेतली पाहिजे. श्रीमंत नागरिकांना नियंत्रित करणे अवघड आहे, म्हणून संपत्ती एका, दोन किंवा प्रशासकाशी निष्ठावान जास्तीत जास्त तीन लोकांच्या हातात केंद्रित केली पाहिजे. गोलवलकर यांच्या विचारांची कसोटी पाहता सरकारच्या आर्थिक धोरणांवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला समजेल की झोल कुठे आहेत. We and Our Nationhood Define च्या सातव्या आवृत्तीच्या पृष्ठ क्रमांक 40 वरून घेण्यात आला आहे.
एकदा तर खरोखर देशावर देशातील जनतेवर तुमचे मनापासुन प्रेम असेल तर नक्कीच विचार करा ..