शितल रामटेके यांना इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी
Summary
राजुरा, गोंडवाना विद्यापीठा द्वारे दि.२१ जून २०२३अधिसूचना नुसार श्रीमती शितल रामटेकेना *दलित लाईफ ऍण्ड कल्चर इन द सिलेक्ट इंडियन इंग्लिश नावेल:एन ऐनलिटीकल स्टडी* अर्थात *निवडक भारतीय इंग्रजी कादंबरीतील दलित जीवन आणि संस्कृती: विश्लेनात्मक अध्ययन* या विषयावर इंग्रजीमध्ये डॉक्टरेट बहाल करण्यात […]

राजुरा,
गोंडवाना विद्यापीठा द्वारे दि.२१ जून २०२३अधिसूचना नुसार श्रीमती शितल रामटेकेना *दलित लाईफ ऍण्ड कल्चर इन द सिलेक्ट इंडियन इंग्लिश नावेल:एन ऐनलिटीकल स्टडी* अर्थात *निवडक भारतीय इंग्रजी कादंबरीतील दलित जीवन आणि संस्कृती: विश्लेनात्मक अध्ययन* या विषयावर इंग्रजीमध्ये डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे. सदर संशोधन तिने सीएचएलआर,पी.जी.टी.डी.ऑफ इंग्रजी ,गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली येथून नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय, ब्रम्हपुरीचे सहयोगी प्राध्यापक डॉ.युवराज मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आहे.सदर डॉक्टरेट डिग्री गोंडवाना विद्यापिठाच्या होऊ घातलेल्या ०५ जुलै २०२३ ला दहाव्या दीक्षांत समारंभात भारतच्या आदरणीय महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्यांचे हस्ते देण्यात येणार आहे.शितल रामटेके नी *अनटचेबल,गॉड ऑफ स्माल थिंग, भार्थीपुरा,संगती, चिलड्रन ऑफ गॉड आणि रेड हिबिसकस*या निवडक इंग्रजी कादंबरीवरती संशोधन केले आहे,ह्यात त्याकाळी जातीयता कशी निर्मिती झाली याबाबत व्यावसायिक, पारंपरिक व ब्राम्हणिकल जातीय सिद्धांताची तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे जातीयता निर्मिती संदर्भातील विचारांचे गहन अध्ययन व आकलन करून प्रबंधात मुद्देसूद मांडणी केलेली आहे.निवड केलेल्या कांदबरीमध्ये दलितांचे जीवन कसे होते व त्यांची संस्कृती कशी होती याचे विवेकपुर्ण संशोधन करण्यात करण्यात आले आहे . शितल रामटेकेचे उच्च शिक्षण एम.ए(इंग्रजी) जगविख्यात युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास,चेन्नई, तामिळनाडू येथून झाले आहे.शितल रामटेकेना पीएचडी मध्ये डॉ. युवराज मेश्राम सोबतच प्रसिद्ध मनोवैज्ञानिक तथा प्राचार्य डॉ.सत्यपाल कातकर,राजुरा यांचे प्रत्येक क्षणी मौलिक सहकार्य लाभलेले आहे,तसेच शितलचे पती मंगेशजी खोब्रागडे व त्यांचे परिवाराकडून प्रोत्साहन लाभल्यामुळेच त्या डॉक्टरेट झाल्या आहेत.शितल रामटेके ह्या डब्ल्यूसिएल,सास्ती ओपनकास्टचे माजी अधीक्षक,किशोरजी रामटेके यांची मुलगी असून आई श्रीमती लक्ष्मी रामटेके यांचे सर्वच स्तरातील सहकार्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे त्या आवर्जून उल्लेख करतात.शितलचा परिवार उच्च शिक्षीत असून,भाऊ राजरत्न रामटेके,चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला सी.एम.ए.(कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंटंट )असून डब्लू.सी.एल.जिएम कार्यलय,माजरी येथे फायनन्स मॅनेजर पदावर कार्यरत आहेत,सदर प्रबंधाचे वाइव वोसी व परीक्षण दुर्ग छत्तीसगड येथील गव्हर्नमेंट डी. टी. कॉलेज,उताई चे प्राचार्य तथा प्रोफेसर डॉ.ए. ए.खान यांनी केले.या संशोधनास पीजीटीडी,गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली चे इंग्रजी विभाग प्रमुख,सहयोगी प्राध्यापक डॉ.विवेक जोशी, तथा श्रीमती डॉ.वर्षा कातकर,राजपत्रित अधिकारी वर्ग-१ यांनी केलेल्या मदतीबद्दल ह्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहे तर त्यांचे यशाबद्दल अभिजीत दुर्योधन,डॉ.सिद्धांत कातकर,धनराज खोब्रागडे,जयप्रकाश दुर्योधन ,सुश्मिता राजरत्न रामटेके, रोहिणी दुर्योधन, प्रा.श्रीनिवास कुम्मरवार,प्रभाकर थुल,विजय उपरे,प्राचार्य रविंद्र पडवेकर,गणपत पुणेकर,जितेंद्र मेश्राम ,बी.एस.पावडे,
गंगारामजी ठेंगरे
बिंदुसार गजभिये, आदींनी अभिनंदन केले आहे.