शाळेकरी विद्यार्थी बेपत्ता पोलीस शोध सत्र सुरू

कोंढाळी-वार्ताहर
चुडामन नीलचंद्र भले43, बाजार गावातील रहिवासी यांनी 16एप्रिल रोजी कोंढाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, १५/०४/२०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता त्यांचा मोठा मुलगा गीतांशू चुडामन वय १४ वर्षे सात महिने हा कोणालाही न कळवता घराबाहेर पडला आहे. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे अखेर गीतांश चुडामणी भले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार मिळताच, कोंढाळी पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि कोंढाळीचे पोलिस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी त्यांच्या पथकासह बाजारगाव गाठले आणि हरवलेल्या मुलाचा शोध सुरू केला. तसेच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी आवाहन केले आहे की कोणाला गितांशू भले दिसले किंवा सापडले तर त्यांनी कोंढाळी पोलिस स्टेशन आणि पोलिस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांचे भ्रमण ध्वनी क्र ९८२३२०७२९७ वर कळवावे. तसेच कोंढाळी पोलिसांकडून शोध सत्र सुरू आहे.