वसंतोत्सव: आर.बी.व्यास कला-वाणिज्य महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे केले सादरीकरण
Summary
कोंढाळी-वार्ताहर दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. राजेंद्रसिंग उर्फ बाबा व्यास कला-वाणिज्य महाविद्यालयात 28 मार्च मंगळवार रोजी सुरु झालेल्या बसंत उत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. आर.बी.व्यास महाविद्यालयाने आयोजित केलेल्या बसंत महोत्सव 2023 चे उद्घाटन कोंढाळीच्या उपसरपंच स्वप्निल […]
कोंढाळी-वार्ताहर
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. राजेंद्रसिंग उर्फ बाबा व्यास कला-वाणिज्य महाविद्यालयात 28 मार्च मंगळवार रोजी सुरु झालेल्या बसंत उत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
आर.बी.व्यास महाविद्यालयाने आयोजित केलेल्या बसंत महोत्सव 2023 चे उद्घाटन कोंढाळीच्या उपसरपंच स्वप्निल व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजू खरडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिकारी डॉ. प्राध्यापक- डॉ. गोपीचंद कठणे डॉ. प्रज्ञासा उपाध्याय यांनी कार्यक्रमा विषयी उपस्थितीतांना
माहिती देताना सांगितले की, आर.बी.व्यास महाविद्यालयात आयोजित बसंत उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, हस्य जत्रा, बेस्ट ऑफ वेस्ट ड्रामा, पुस्तक प्रदर्शन, वास्तु कला, आनंद मेळावा, रांगोळी, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दुसरीकडे, बुधवार, 29 मार्च रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थिनींनी लोकनृत्य, नृत्य, मिमिक्री, एकल नृत्य, समूह नृत्य अशा एकापेक्षा एक सादरीकरण केले.
यासोबतच युवा महोत्सवात विविध उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना 29 मार्च रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी
डॉ.लोमेश्वर घागरे-डॉ.हरिदास लाकडे -डॉ.महेंद्रसिंग राठोड व प्राचार्य विजय भोसे-यांचे दोन दिवसीय वसंतोत्सवानिमित्त शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे सहकार्य लाभले. अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुखांनी दिली.