रुपये गेले , फुलं आले.विरोधक होते तेव्हा बोंबलत सुटलं, 🔹 सत्तेत आल्यावर भाकरीच्या तुकड्यांची पाहात बसलं वाट ? 🔹 देवेंद्र फडणवीस आणि सरकार करणार का समायोजनाचे काम.

नागपूर / प्रतिनिधी दि.१० मार्च २०२४:-
महाराष्ट्रातील हजारो आरोग्य कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी मागील १५ वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम करित आहेत.कोरोनाच्या महाभयंकर संकटात जिवाची पर्वा न करता रूग्णांची अविरत सेवा केली. तरीही शासनाने त्यांना बिनशर्त कायम सेवेत सामावून घेतले नाही तर कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पहात बसले आहे का ? यातील सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शासनाने आरोग्य कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन व्हावे यासाठी मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरूच होते. आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी युनियनचे अध्यक्ष दिलीप उटाणे आणि गडचिरोली ,भंडारा , गोंदिया जिल्ह्यातील काही समन्वयक सुध्दा अरुण खरमाटे सारखे स्वाभिमान गमवुन नालायक निघाल्याने सेवेचे दहा पेक्षा अधिक वर्षं होऊनही अनेकांवर अन्याय केला आहे . त्यामुळे आरोग्य सेवेत कंत्राटी पध्दतीने काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
राजेश टोपे आरोग्य मंत्री असतांना
अरुण खरमाटे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील समन्वकांनी एक रुपयाच्या नावाखाली एकेक लाख रुपये गोळा करणे सुरू केले होते. आता रुपयांची जागा फुलांनी घेतली असून महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना समन्वयकांच्या माध्यमातून लुबाडणूक करून दिलीप उटाणे आणि अन्य सहकाऱ्यांच्या मदतीनं नागपुरात हापपॅंट वाल्यांचे घरं भरल्या जाणार आहेत. राजेश टोपे आरोग्य मंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणास कडाडून विरोध केला होता मात्र आता देवेंद्र फडणवीस हे काही चेल्या चपाट्यांच्या माध्यमातून लुबाडणूक करित असल्याचे चर्चिले जात आहे.
त्यावेळी भारतीय शेतकरी पक्षाने हा प्रश्न उपस्थित केला होता. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने समायोजन व्हावे यासाठी फुलांचा सुगंध दळवळावा यासाठी गुच्छ 🌹 पुरवठा केल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील फुलं जमा करण्यात आली असून ती कुठे पोहोचली . आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीने समायोजन व्हावे यासाठी फुलांचा सुगंध दळवळावा यासाठी गुच्छ 🌹 पुरवठा केल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातुन रुपयांना फुलं संबोधुन पैसे जमा केले जात आहेत. त्यासाठी समन्वयकांच्या मुंबई , नागपूर फेऱ्याही वाढल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील समन्वकांनी तीन खोके नागपुरात वास्तव असलेल्या मंत्र्यांकडे काही दलालांच्या माध्यमातून पोहचविले असल्याची खमंग चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील फुलांच्या नावाखाली जमा करण्यात येणारा पैसा गडचिरोलीच्या बसस्थानक परिसरात आणुन दिले जात होते आणि ती स्कार्फ बांधून येऊन पैसे घेऊन जात असल्याची चर्चा आहे . त्या गाडीचा क्रमांक आणि नावही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर गडचिरोली तालुक्यातील पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे फुलं 🌺 जमा झाल्याचे सांगुन इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना समायोजन तातडीने होणार अशी आशा देत पैसे जमा करण्याची मोहीम एका समन्वयीकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात समन्वयकांची भरमसाठ संख्या असल्याने फुलं संबोधुन पैसे जमा करायला वेळ लागणार नाही. सत्तेत नसतांना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणास कडाडून विरोध केला होता मात्र सत्तेत आल्यावर फुलं जमा करण्यात गुंतले आहेत का ? जवळपास हा घोटाळा ५० ते ६० कोटी फुलांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम करित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पाहत बसलेल्या शासनकर्ते यांना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडुन पैसे घेण्याची लाज वाटत नाही. महाराष्ट्रातील बेशरमांचे सरकार आणि त्यांच्या जोडीला बसलेल्या हापपॅंट वाल्यांमुळे महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी , अधिकारी , कामगार , शेतकरी , बेरोजगार तरुण आणि जनता हवालदिल झाली आहे. ओडिसा , मनिपुर , राजस्थान , पंजाब या राज्यातील मंत्रीमंडळ कॅबिनेट बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत निर्णय घेऊन , नियमित सेवेचा दर्जा आणि वेतनश्रेणी प्रदान केली आहे. मात्र महाराष्ट्रातील बेशरमांचे सरकार आणि शासनकर्ते झोपेचं सोंग घेऊन फुलांच्या नावाखाली कुत्र्यासारखे भाकरीच्या तुकड्यांची वाट पाहत बसले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सलग दहा वर्षे पूर्ण झालेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी तात्काळ सहसंचालक सुभाष बोरकर यांनी दिनांक ५ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील संबंधित सर्व प्रमुखांना कळविले आहे. तरीही फुलांचा वापर केला जात असल्याने अनेकांना गहन प्रश्न पडला आहे. गडचिरोलीसह महाराष्ट्रात फुलांचा मुख्य सुत्रधार कोण असावा याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.