BREAKING NEWS:
हेडलाइन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती व गोंडवाना विद्यापीठाचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Summary

गोंडवाना विद्यापीठाचा ९ वा वर्धापन दिन आज दि. २ ऑक्टोबर, २०२० रोजी शुक्रवार ला ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या सभागृहातुन संपन्न झालेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व विद्यापीठ गीताने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून […]

गोंडवाना विद्यापीठाचा ९ वा वर्धापन दिन आज दि. २ ऑक्टोबर, २०२० रोजी शुक्रवार ला ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या सभागृहातुन संपन्न झालेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व विद्यापीठ गीताने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. कुलगुरु प्रा. टी. व्ही. कट्टीमनी, द सेन्ट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश हे उपस्थित होते. सदर प्रसंगी सुप्रसिद्ध समाजसेवक मा. पुरुषोत्तम उपाख्य मदन धनकर, चंद्रपूर यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. पराग पुरुषोत्तम धनकर यांनी स्वीकारले. सदर प्रसंगी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, अधिष्ठाता, संचालक, विद्यापीठाचे अधिकारी व विविध महाविद्यालयांचे अध्यक्ष/सचिव, प्राचार्य, प्राध्यापक, पत्रकार, विद्यापीठाचे व संलग्नित महाविद्यालयांचे कर्मचारी आणि विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर श्रावण मोहूर्ले यांनी केले . त्यानंतर स्वागत व प्रास्ताविकपर भाषणामध्ये डॉ. ईश्वर श्रावण मोहूर्ले यांनी मागील ९ वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा व सुरू असलेल्या कार्याचा अहवाल वाचून सांगितला. त्यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये विद्यापीठाला शासन स्तरावर होत असलेली मदत व त्याकरिता विविध मान्यवरांकडून होणाऱ्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले. महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जन्मदिनी आज दि. २ ऑक्टोबर, २०२० रोजी विद्यापीठास ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केल्याने ‘दशमणोत्सव’ वर्ष म्हणून साजरे करण्याचा विद्यापीठाने निर्धार केला. विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करणे, कर्मयोगी बाबा आमटे उन्नत ग्राम अभियान योजना (किमान ५ गावे) राबविणे, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम आणि योजना राबविणे, कमवा व शिका योजना राबविणे, आंतरविद्याशाखीय संशोधन जर्नल सुरू करणे तसेच विद्यापीठास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मध्ये अदिवासी विद्यापीठाचा दर्जा मिळावा याकरिता विषेश तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही विषद केले ई. योजना व कार्यक्रम राबवून २०२०-२१ हे ‘दशमणोत्सव’ वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंहजी कोशियारी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ९ व्या वर्धापन दिनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या व गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. गोंडवाना विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संशोधनात्मक कार्य करेल अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. टी.वी. कट्टिमनी, कुलगुरू , द सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा हे वनव्याप्त असल्यामुळे वनावर प्रकिया करणारे शिक्षण विद्यापीठामध्ये शिकविण्याबाबत तसेच लहान लहान उद्योगाची स्थापना करून गडचिरोली जिल्हातील आदिवासी लोकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्याबाबत सांगितले. वनौषधी व वनापासून मिळणारे उत्पादन यावर प्रकिया करून राष्ट्रीय व जागतिक पातळीवर गडचिरोली, चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठाचे नावलौकिक करता येईल. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये वनऔषधीवर आधारित प्रकिया उद्योग व त्यांचे व्यवस्थापन असे अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हातील विद्यार्थ्यांनी बाहेर ठिकाणी जाऊंनच आपला विकास होईल ही भावना न बाळगता गडचिरोली व चंद्रपूर इथे राहून वणापासून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या लहान लहान उद्योगाची स्थापना करावी व त्यापासून गरजू लोकांना रोजगार निर्मिती करून द्यावी. या करिता विद्यापीठ स्तरावर आदिवासी लोकांकरिता अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात यावी. शिक्षकांनी आपले कार्य सीमित न ठेवता परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावेत. तसेच गोंडवाना विद्यापीठातील समाजविज्ञान शाखेतील प्राध्यापकांनी गोंडी भाषेचे शिक्षण घेऊन आदिवासी लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यांना विद्यापीठातर्फे शक्य तेवढी मदत करावी. गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासाकरिता भविष्यामध्ये द सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश व गोंडवाना विद्यापीठामध्ये करार करण्याचा मी निर्णय घेत आहे. जेणेकरून द सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्रप्रदेश च्या वतीने शक्य तेवढी मदत गोंडवाना विद्यापीठास उपलब्ध करून देता येईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जन्मदिनी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगितले. आज ९ वर्ष विद्यापीठाला पूर्ण होत आहेत. दि. ७ सप्टेंबर, २०२० रोजी मी या विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळेपासून मला सदर विद्यापीठ हे आदिवासी विद्यापीठ असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. दि. २३/०९/२०२० रोजी विद्यापीठास १२(बी) चा दर्जा यु.जी.सी. कडून प्राप्त झालेला आहे. याकरिता यापूर्वी कार्यरत मा. कुलगुरु, मा. कुलसचिव, संचालक, अधिष्ठाते, विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागामुळे प्राप्त झाले आहे.

सदर विद्यापीठ आदिवासी भागात आहे याचा उहापोह करण्यापेक्षा व यास कमी लेखण्यापेक्षा सदर विद्यापीठ जरी आदिवासी भागात असले व कमी प्रमाणात सोयी सवलती उपलब्ध असल्या तरी ज्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झालेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती उपलब्ध आहे. याचा एक सकारात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. वनसंपतीवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापण्यापासून तर सदर उद्योग स्थापणेकरिता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यापर्यंतचे कार्य विद्यापीठाला करता येणे शक्य आहे. जेणेकरून याचा फायदा विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना होईल. कुलसचिवांनी विषद केलेल्या बाबींवर मा. कुलगुरु महोदयांनी विस्तृत माहिती दिली.

गोंडवाना विद्यापीठाची इतर विद्यापीठाशी तुलना न करता विद्यापीठाचे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आदिवासी बोली भाषा गोंडी व मराठीचा वापर करणे आवश्यक आहे. शहरी भागाच्या जीवणापेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील जीवनमान अधिक आरोग्यदायी आहे. त्यामुळे भविष्यात गोंडवाना विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किंबहूना इतर लोकांची गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याकडे वाटचाल होईल. या दृष्टीने सदर विद्यापीठाने प्रगती करणे आवश्यक आहे.

सदर प्रसंगी डॉ. पराग पुरुषोतम धनकर यांनी सुप्रसिद्ध समाज सेवक मा. पुरुषोत्तम उपाख्य मदन धनकर, चंद्रपूर याना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल मा. पुरुषोत्तम उपाख्य मदन धनकर, चंद्रपूर यांच्या वतीने विद्यापीठाचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच त्यानी मा. पुरुषोत्तम उपाख्य मदन धनकर, चंद्रपूर यांच्या शेक्षणिक व समाजीक कार्यांची जाणीव सर्वांना करून दिली.

सदर प्रसंगी जीवन साधना गौरव पुरस्काराव्यतिरीक्त उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आनंद निकेतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरोरा जि. चंद्रपूर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉ. सुरेश बाकरे , श्री. ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव, जि. चंद्रपूर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. नरेंद्र टी. आरेकर, श्री. गोविंदराव मुनघाटे आर्टस अॅड सायंस कॉलेज, कुरखेडा जि. गडचिरोली, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) श्री. प्रशांत सुर्यभान पुनवटकर, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ४) श्री. गौरव चौधरी, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालय) श्री . शशांक एस. नामेवार, शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर जि. चंद्रपुर, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालये) श्री. अनिकेत नामदेव दुर्गे, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर व श्री. राजेश बसवेश्वर हजारे, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, उत्कृष्ट विद्यार्थींनी पुरस्कार (संलग्नीत महाविद्यालये) कु. रोशनी दीपक नागपुरे, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर व कु. मयुरी सुरेश आत्राम, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिल्पा आठवले यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. श्रीराम कावळे, अधिष्ठाता (मानवविज्ञान विद्याशाखा) यांनी केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली

One thought on “राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती व गोंडवाना विद्यापीठाचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *