राजकिय पदाधिकारी आता !!! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत ओबीसी प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रिये मुळे विलंब होण्याची शक्यता!!
काटोल/ कोंढाळी -:
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (जि.प, नगरपरिषद, नगर पंचायत पंचायत, महानगरपालिका) या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होऊ शकतात, मात्र या निवडणुकांबाबतचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे ओबीसी प्रवर्गातील खटला न्यायालयात दाखल आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक १० व १२तसेच अन्य परीक्षाही आहेत.या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. किंवा मे महिन्यातही होऊ शकते. विधानसभा निवडणुकीची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर विधानसभेतही हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो. काटोल विधानसभा मतदारसंघात काटोल, नरखेड, मोवाड, नगरपरिषद, कोंढाळी, नगर पंचायत, आणि 09 जि.प., काटोल-नरखेडच्या 17 पंचायत समित्या आणि नागपूर ग्रामीणचे बाजार गाव जि.प. काटोल मतदारसंघांतर्गत काटोल तहसीलचे येनवा, पारड सिंगा, मेटपांजरा, कोंढाळी चार जिप सर्कल आणि त्यांचे येनवा, झिलपा, पारड सिंगा, लाडगाव, मेटपांजरा, रिधोरा, कोंढाळी आणि धोतीवाडा या आठ पंचायत समित्या आहेत. काटोल विधानसभा, नरखेड तालुका, काटोल तहसील आणि नागपूर ग्रामीणमधील बाजार गाव मंडळात सर्व 09 जि.प. सर्कल आहेत ,यात काटोल तालुक्यात दोन भाजप, एक शेकाप, एक राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) तर नरखेड, काटोल पंचायत समिती काटोल नरखेड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. नरखेड , काटोल, मोवाड नगरपरिषद तर कोंढाळी नगरपंचायती वर प्रशासक आहेत, कोंढाळी नगर पंचायत झाल्यावर कोंढाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलच्या हद्दवाढीचे कामही झालेले नाही, तसेच कोंढाळीत प्रथमच नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. आहेत. काटोल/नरखेडच्या पंचायत समिती सभापतीचे त्यांच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यात काहीसा मतभेद असल्याचे समजते. काटोल विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जि.प. व पं.स सर्कलसह नगर पंचायत व नगरपरिषदेबाबत यावेळी चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे., मात्र नागपूर जिल्हापरिषद माजी मंत्री सुनील केदार यांच्या ताब्यात आहे. लोकसभेचे खासदार काँग्रेसचेच आहेत, हे लक्षात घेता, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती होणे कठीण दिसते, त्यानंतर भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही विधानसभा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत . गेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती (भाजप सेना) सत्तेत होती, तेव्हा सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पैकी दोन तृतीयांश सदस्य आणि लोकसभेचे खासदारही जिंकले होते. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढावे लागणार आहे. तर लाडली बहिन योजना म्हणजे शेतकरी वीज बील माफ,भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस (अ प)युती सत्तेवर असून जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती पूर्ण बहुमताने काबीज करण्यासाठी तयार आहेत. कोंढाळी जिल्हा परिषदेसाठी माजी सभापती योगेश चाफले, आदर्श ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच सुधीर गोतमारे, निळकंठराव ढोरे, रामदास मरकाम, काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश पाटील चव्हाण, भा ज पा मंत्री निखिल जैस्वाल, प्रकाश बारंगे, लताताई धारपुरे,थॉमस निंभोरकर, किशोर रेवतकर, सतीश पुंजे, ममराज चव्हाण, योगेश गोतमारे, रवी गुंड, त्याचप्रमाणे मेटपांजरा जि प. साठी चंद्रशेखर चिखले, संजय डांगोरे, वैशाली टालाटुले, सुभाष माहुरे, रवी जैस्वाल, पदम पाटील डेहनकर, वैभव राऊत, मंगला काळबांडे, नरेश नागपुरे, प्रशांत डेहनकर, यांच्यासह कांग्रेस भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी (दोन्ही गट), आर पी आय, गो गो पा, , वंचित बहुजन आप आदी राजकीय पक्षांचे उमेदवार आपले नशीब आजमावतील. तसेच नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत कोंढाळीच्या नगराध्यक्षपदासाठी – खुला प्रवर्ग झाल्यावर स्वप्नील व्यास, संजय राऊत, प्रमोद चाफले, कमलेश गुप्ता, सलमा पठाण, यादव बगडते, बलकिसन पालीवाल, अरुण खोडणकर, पुरुषोत्तम हगवणे, विशाल काळबांडे, अन्सार बेग, गोपाल मकोडे, गफ्फार शेख, सुरेंद्र कुर्वे,विनोद माकोडे, मोहसीन शेख, बाबा राव, दुर्गा प्रसाद पांडे, सुनीता गजबे,ऋणूजा गायकवाड, प्रशांत खंते, आकाश गजबे, नितीन ठवळे, बबलू बिसेन,अफसर हुसेन, लक्ष्मीकांत खवळे, तुषार राऊत, यांच्यासह अनेक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्षांनीही सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.
ओबीसी आणि न्यायालय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी वर्गाची भूमिका मतदार आणि उमेदवार या दोघांमध्येही महत्त्वाची असते, मात्र सध्या ओबीसी वर्गाच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात विचाराधीन आहे,या कारणास्तव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित होत आहे. ओबीसी प्रवर्गाबाबत भविष्यात राज्य सरकार आणि न्यायालय काय भूमिका घेते याकडे ओबीसी प्रवर्गाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी-फेब्रुवारीत होणार. मात्र ह्या निवडणुका फरवरी की मे महिन्यातही झाल्यास निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे.